हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !


नाशिक शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !
                                                                           नाशिक, दिनांक (जिमाका वृत्तसेवा)::- 
नाशिक शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी येणाऱ्या अभ्यांगतांची शहरातील विविध हॉटेल्समध्ये निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने नाशिक कार्यालयात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी यांची आवश्यकतेनुसार अन्न नमुने तपासणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यादृष्टीने शहरातील हॉटेल व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतुदींचे पालक करावे, असे आवहन सं.भा. नारागुडे, सह आयुक्त (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
          राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे, या महोत्सावासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील विविध हॉटेल्ससह महायुवाग्राम, हनुमाननगर तपोवन, पंचवटी, उधोजी महाराज वास्तू संग्रहायल मैदान, के.टी.एच.एम कॉलेजजवळ आणि  महाकवी कालिदास कलामंदिर मैदान येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत तपासणी करून  केटरिंग चालकांना आवश्यक सूचना देणे तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाफूड एक्स्पो मध्ये सहभाग घेणा-या व्यावसायिकांनीही कायद्यानुसार आवश्यक नोंदणी करूनच स्टॉल्स लाववेत असेही सहआयुक्त नारागुडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !