आज पाणीदार व्यक्तीमत्व उर्फ पाणदेव कै. ए.टी.पवार यांची जयंती ! सक्षम व विकासात्मक बिरूदावलीचा सर्वमान्य नेता ! विशेष लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
शनिवार दि.1 डिसे माजी मंत्री ए.टी.पवार जयंती)
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
विकासाचा ध्यास घेतलेला कर्तृत्ववान नेता:ए.टी.पवार
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
ए.टी.पवार जयंतीनिमित्त विशेष लेख...
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

राजकीय क्षेत्रात वावरत असतांना राजकारणाला समाजकारणाची जोड देत प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त जनतेच्या विकासाचा ध्यास घेवुनच जगणारे नेते फार दुर्मिळ असतात.विकासाच्या बळावर पन्नास वर्ष मतदारसंघातल्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची किमया साधलेले राज्याचे माजी अदिवासी विकासमंत्री कै.ए.टी.पवार यांची आज जयंती.त्यानिमित्त त्यांच्या कार्य  कर्तृत्वाचा वेध घेणारा हा लेख....

              ज्यांच्या दुरदृष्टीने कळवण तालुका सुजलाम् सुफलाम् झाला,ज्यांच्या नेतृत्वाने कळवण तालुका रस्ते,पाणी,जलसिंचन या सर्वच बाबतीत प्रगतीपथावर राहिला आणि ज्यांच्या कर्तृत्वाचा कळवणकरांना सदैव अभिमान राहिला असे लोकप्रिय नेतृत्व म्हणजे स्वर्गीय ए.टी.पवार.
               विकासाचा ध्यास घेत पवारांनी राजकारणात प्रवेश केला अन् पुढची पन्नास वर्ष कळवण आणि ए.टी.पवार हे एक समिकरणच बनून गेले.तालुक्याचा भुगोल तोंडपाठ असलेले अन् तालुक्याला विकसीत करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेले ए.टी.पवार सतत विकास आणि विकास हाच मुलमंत्र घेवुन जगत आणि लढत राहिले.जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात ज्यांच्या विजयाची नोंद नेहमीच घेतली जायची त्या ए.टी.पवारांनी आपली राजकीय शालीनता नेहमीच जोपासली.काम,काम आणि फक्त काम हाच एकमेव ध्यास घेवुन पवारांनी कळवण तालुक्यातल्या खेड्यापाड्यात विकासाची गंगा पोहचवली.अदिवासी,दुर्गम भागात दळवणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण करत असतांना गावागावात विकासाच्या असंख्य योजना पोहचवुन आपल्या कामाची छाप पाडली.आठ वेळा विधानसभेत कळवण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या पवारांनी कधीच कसला स्वार्थ बाळगला नाही.तालुक्यातल्या तळागाळातल्या घटकापर्यंत विकास कसा पोहचेल यासाठी पवार सातत्याने प्रयत्नशील राहीले.जनतेचे काम प्रलंबित राहत असेल तर प्रसंगी शासनदरबारी मंत्र्यांना हात जोडुन मतदारसंघात कामे ओढुन आणण्याची हातोटी पवारांमध्ये होती.म्हणुनच अनेक नेत्यांना पवारांविषयी आदर वाटत असे.कळवण तालुक्यात कधीच कुठलाच पक्ष नव्हे तर ए.टी.पवार हाच एकमेव पक्ष मानला जायचा.ए.टी ज्या पक्षात त्या पक्षाची एक जागा विधानसभेत पक्की समजली जात असे.कळवण तालुक्यात विकासकामे करण्यात पवारांनी कुठलीही कमतरता ठेवली नाही.दळवट चे सरपंच ते राज्याचे अदिवासी विकासमंत्री हा पवारांचा राजकीय प्रवास जनतेच्या पाठबळावर अन् पवारांच्या कर्तृत्वावर झाला.कळवण तालुक्यातल्या जनतेचे प्रचंड अन् उदंड प्रेम पवारांना लाभले.तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या अदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळा तालुक्यात निर्माण केल्या.आश्रमशाळांच्या टोलेजंग देखण्या इमारती उभ्या राहिल्या अन् अदिवासींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण झाली याचे श्रेय ए.टी.पवारांनाच जाते. खेड्यापाड्यात,डोंगरदऱ्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले अन् दळणवळण सुलभ झाले.गाव तेथे रस्ता झाल्याने सर्वसामान्य जनतेला प्रवास सुखाचा झाला.तालुक्यात छोटी धरणे,लघुपाटबंधारे प्रकल्पासह अर्जुनसागर धरणाच्या निर्मितीने तालुक्याचा पाणीप्रश्न मिटला.ए.टी.पवारांनी केलेल्या विकासकामांचे उदाहरण जिल्ह्यात व राज्यात इतर ठिकाणी दिले जावु लागले.आठ वेळा आमदार अन् चार वेळा राज्य मंत्रीमंडळात मंत्रीपद भुषविलेल्या पवारांनी कळवण तालुक्याच्या चौफेर विकासात कुठलीच कसर सोडली नाही.
           कळवण तालुक्यातल्या जनतेने आठ वेळा ए.टी.पवारांना निवडुन देत विकास करणाराच लोकप्रतिनिधी हवा या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले.विधामसभेची निवडणुक आली की पवारांना पराभुत करण्यासाठी विरोधकांची एकजुट व्हायची.पवारांचा पराभव होणार अशी हवा पसरवली जायची.मात्र ए.टी.पवार सर्वांचेच डावपेच कुचकामी ठरवत दिमाखदार अन् प्रचंड मताधिक्याने विजयी व्हायचे याचे कारण जनतेचे त्यांच्यावर आणि त्यांच्या कामावर असलेले प्रचंड प्रेम होय.मागील वर्षी ए.टी.पवारांचे निधन झाले.पवारांचा राजकीय अन् सामाजिक कामाचा वारसा त्यांचे थोरले पुत्र जिल्हा परिषद सदस्य नितिन पवार,स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या जयश्री पवार,स्नुषा जिल्हा परिषद सदस्या डॉ.भारती प्रविण पवार हे पुढे चालवत आहेत.पवारांनी मतदारसंघासाठी दिलेले योगदान,केलेली प्रचंड विकासकामे जनतेच्या सदैव स्मरणात राहील.त्यांचे काम सर्वसामान्य जनता कदापी विसरणार नाही.ए.टी.पवारांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाची उणिव मात्र कळवण-सुरगाणा मतदारसंघातल्या जनतेला नेहमीच जाणवत राहील.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
जनतेच्या मनातला 'पाणदेव'-

भविष्यात पाण्यासाठी कळवण तालुक्यातल्या जनतेवर दुसऱ्या कोणावर विसंबुन राहण्याची गरज पडायला नको हे लक्षात घेवुन ए.टी.पवारांनी तालुक्यात जलसिंचनाचे मोठे काम उभे केले.पुनद धरणासह असंख्य लघुपाटबंधारे प्रकल्प उभारुन पाण्याचा प्रश्न तालुक्यातल्या जनतेला भेडसावणार नाही यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले.कळवण तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असलेल्या पवारांनी जलसिंचनासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याने सर्वसामान्य जनतेत 'पाणदेव' म्हणुन ए.टी.पवारांची ख्याती आहे.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
शब्दांकन-राकेश हिरे,
साभार दै.लोकमंथन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!