कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम केशव डिंगोरे : जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!




कागदावरच निर्बंध शिथिल, जाच मात्र कायम

केशव डिंगोरे :

जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन उठवणार आवाज !

     नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते, मात्र हे निर्बंध कागदावरच शिथिल असून, मंडप डेकोेरेटर्स व या व्यवसायाशी निगडीत इतरांना जाच कायम आहे. त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात असोसिएशनच्या व्यासपीठावरून आवाज उठविला जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
असोसिएशनच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केशव डिंगोरे म्हणाले की, ‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंडप डेकोरेशन, बॅण्डपथक, लॉन्स धारक व या व्यवसायाशी निगडीत इतर लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता शासनाने निर्बंध शिथिल केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र निर्बंध अजून कायम आहेत. लॉन्सधारकांना अजूनही स्थानिक प्रशासनाचा जाच आहे. अधिकाऱ्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत आमचे मरण होत आहे. पालकमंत्र्यांना भेटल्यास अधिकारी दुखावले जात आहेत. तर पालकमंत्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा सल्ला देत आहेत. त्याचबरोबर लग्नसमारंभासाठी २० पेक्षा अधिक जाचक नियम घालून दिले आहेत. जीएसटीचा जाच भयंकर आहे. गेल्या दोन वर्षांत वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. यासर्व परिस्थितीत व्यवसाय करायचा तरी कसा असा सवाल डिंगोरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मंडप डेकोरेशन व या व्यवसायाशी निगडीत इतरांना न्याय देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, याप्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली जाणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी यावर काहीच तोडगा काढला नाही, तर आत्मदहन आंदोलन केले जाणार असल्याचा इशाराही डिंगोरे यांनी याप्रसंगी दिला.
---
चौकट
प्रथम वर्धापनदिन उत्साहात
ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन संलग्न नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकिशन पुरोहित, महाराष्ट्र अध्यक्ष सागर चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश पेट्रॉन अशोक रुहिया, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, प्रभारी विजयसिंग परदेशी, पश्चिम महाराष्ट्र सुमित माळी, खांदेश अध्यक्ष दामोधर पांडे, अहमदनगर अध्यक्ष चंद्रकांत  मेहत्रे, धुळे जिल्हाध्यक्ष दिलीप पारख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात किशोर डिंगोरे यांनी सर्व व्यवसाय बांधवांना एकजूट होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष दाऊद काद्री, सचिव अनिल अमृतकर, सुनिल महाले यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।