संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज- पोतदार.

           वाडीव-हे::-मोबाईल वरील समाजमाध्यमामुळे नव्वद टक्के पीढ़ी वाचन संस्कृति पासून दूर गेली आहे, समृद्ध जीवन जगण्यासाठी पुस्तकांचे वाचन अतिशय महत्वाचे आहे. स्वताचे जीवन, आपले संस्कार, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील त्यासाठी पुस्तकेच मार्गदर्शक ठरतील, त्यासाठी पुस्तकांना गुरु स्थानी ठेवून आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवता येईल असे प्रतिपादन वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार यांनी केले. इगतपुरी तालुका साहित्य मंडळ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात एका परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
     वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधुन "वाचाल तर वाचाल" या विषयावर पोतदार यांनी मार्गदर्शन केले तर "मराठी भाषेचे महत्व आणि संवर्धन" या परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्रथमता प्रतिमापुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांनी ग्रंथालयाचे महत्व विषद केले, अँड. ज्ञानेश्वर गुळवे यांनी मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले, तर जेष्ट साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी मराठी भाषेची स्थित्यन्तरे, तीचे महत्व, आणि संवर्धन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदेदुमलाचे माजी सरपंच रमेश जाधव यांनी वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करून तरुणांना वाचनाची प्रेरणा देण्याची गरज असल्याचे मत मांडले.
     यावेळी परमेश्वर नाठे, तुकाराम नाठे, नंदराज गुळवे, प्राचार्य तुषार पाटिल, शिक्षक धात्रक आदींसह महविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा. धात्रक यांनी केले तर आभार प्राचार्य पाटिल यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!