आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन !

 
          नासिक::-२१ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांचे तर्फे नाशिक जिल्ह्यात साजरा होणार राष्ट्रीय गलगंड दिवस अर्थात आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम २०२१, प्रत्येकाच्या शरीरातील आयोडीनचे प्रमाण चांगले राखण्यासाठी व गलगंड होऊ न देणे कामी जनजागृती दिन साजरा करण्यात येतो, राष्ट्रीय गलगंड दिनाचे ( आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम ) औचित्य साधून नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये राष्ट्रीय गलगंड दिनानिमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिचारिका प्रशिक्षण विभागाच्या विद्यार्थिनी तसेच आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये निबंध स्पर्धा होणार असून, घोषवाक्य तयार करणे, पोस्टर तयार करणे, चित्र गोष्ट तयार करणे,  तसेच पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती करण्यात येणार आहे. पेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर राष्ट्रीय गलगंड दिन साजरा करण्यात येणार आहे, याची पूर्वतयारी करण्यात येत असून आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर सुशील वाकचौरे यांनी याबाबत जनजागृती चांगल्याप्रकारे करण्यात येऊन आहारामध्ये आयोडीन चे प्रमाण चांगल्या प्रकारे राखल्यामुळे मतिमंदत्व तसेच बालकाच्या वाढ विकासातील अडथळे आपण सहजतेने दूर करू शकतो, यासाठी समाजामध्ये गलगंड आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे,  दिनांक २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सर्वांनी या आजाराविषयी लोकांना माहिती देऊन जनजागृती करावी असे आवाहन प्राचार्य डॉ सुशील वाकचौरे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अधिवेशनात मांडला ठराव-विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा !

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!