प्रतिक्षा संपली,,,,,,,,, मा. खास. श्री. श्रीनिवास पाटील यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर झळकणार !

प्रतीक्षा संपली......
    ज्याची न्यूज मसालाचे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक दरवर्षी आतुरतेने वाट पहातात ती प्रतीक्षा आता संपली आहे. आनंदाची बातमी म्हणजे राष्ट्रीय विक्रम नोंदविणारा, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेला पहिलाच आणि एकमेव न्यूज मसाला चा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर यंदा ११ वे पुष्प गुंफताना खा. श्रीनिवास पाटील यांचे छायाचित्र प्रकाशित होणार आहे.


          सातारा मतदारसंघातून ३ वेळा खासदार झालेले श्रीनिवास पाटील यांचे वय ८२ आहे हे त्यांच्याकडे पाहून कोणालाही खरे वाटत नाही. एमए, एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर प्रथम त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला. जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांना नृत्याची विशेष आवड होती. आंतरराज्य समूह स्पर्धेत त्यांनी सहभागी होऊन आपल्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले होते.

चौफेर वाचन, दांडगा लोकसंपर्क, जनतेशी जुळलेली नाळ ही त्यांची वैशिष्ट्ये. सर्वांशी आपुलकीच्या नात्याने वागणारे खा. श्रीनिवास पाटील म्हणूनच सर्वांना आपले आधार वाटतात. सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी उत्तम सेवा बजावली ती सर्वांच्या स्मरणात आहे.
    सामाजिक जाणीव असलेले उत्तम वक्ते व माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांचे छायाचित्र २०२२ च्या दिवाळी अंकाच्या   मुखपृष्ठावर प्रकाशित करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे. महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते. याचे सारे श्रेय आपलेच आहे. वेळोवेळी जे प्रेम, मार्गदर्शन न्यूज मसाला परिवाराला ज्यांच्याकडून मिळते त्या ज्ञात-अज्ञात सर्व मान्यवरांचे आम्ही ॠणी आहोत, असेच सतत आमच्या पाठीशी रहाल या सदिच्छेसह आपणाशी हा संवाद साधताना समाधान होत आहे.
              
 संपादक लोकराजा दिवाळी विशेषांक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!