कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन !

कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन !

 डॉ. शांताराम नाईक यांचे आकस्मिक निधन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम बाबुराव नाईक (निवृत्त) यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी कांदिवली येथील राहत्या घरी ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.

८ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या डॉ. शांताराम नाईक यांचे अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाले होते. तर एल्फिन्स्टन महाविद्यलयात त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल (के. ई. एम.) आणि शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम. बी. बी. एस. पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात रूजू झाले. 
त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. अतिशय शांत, संयमी तसेच इतरांच्या समस्येत सल्ला देऊन त्यांना सुयोग्य मार्ग दाखवणारे डॉ. शांताराम नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे समस्त कुटुंब, सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार दुःखात बुडाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात- पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश. ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करा

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

शासकीय विभागातील पदभरतीच्या बनावट जाहिरातींपासून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सावध रहावे !!