दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे !  कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!

         नाशिक ( प्रतिनिधी ) दातार कुळातील अनेक व्यक्ती देशभरात तसेच जगभरात पोहोचलेल्या आहेत. दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे. आपले नाव सार्थक करून ते समाजापुढे आदर्श निर्माण करतात. ही वृत्ती सर्वांनी अनुसरावी अशीच आहे असे प्रतिपादन निवृत्त कमोडोर हर्षद दातार यांनी केले. अखिल भारतीय दातार कुलसंमेलनाच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. 

        सर्व दातार कुटुंबियांचे चौथे कुलसंमेलन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले. रविवारी (दि.१) गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालय येथे हे संमेलन झाले. कमोडोर हर्षद दातार यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. कुलसंमेलन अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी - दातार उपस्थित होते. त्यांनी कुलवृत्तांत व आगामी निवडणूकीच्या संदर्भात माहिती दिली. दातार कुळात आगरकर, आघारकर, कुलकर्णी, वर्तक, फडणीस, सबनीस, दप्तरदार, चौकर यांचाही समावेश असल्याने त्यांचाही सहभाग होता. माहेरवाशिणींसह अनेकांनी उपस्थिती नोंदवली. सकाळी ९ वाजता संमेलनाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र तथा बाबासाहेब दातार उपस्थित होते. त्यांनी दातार जेनेटिक्स करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. 

        विनायक रानडे यांनी जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेल्या "ग्रंथ तुमच्या दारी" या समृद्ध वाचक चळवळीचा आढावा घेतला. ऍड. सायली गोखले -आगरकर यांनी योग्य न्याय मिळावा असे वाटत असेल तर साक्षीदारांनी निर्भयपणे पुढे येण्याची गरज व्यक्त केली. तसेच आधाराश्रम या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय दातार, पदाधिकारी प्रभाकर केळकर, कल्याणी दातार यांची उपस्थिती होती. कार्यवाह सुनीता परांजपे यांनी आधाराश्रमाच्या ७० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देणग्यांचा भक्कम आधार देण्याचे आवाहनही त्यांनी केले.आदिती व प्राची आघारकर यांनी सर्व मुलाखती घेतल्या.
            वंशावळीची माहिती मंदार दातार यांनी दिली तर चित्तपावन ब्राह्मण संघाची माहिती नितीन सहस्त्रबुद्धे यांनी दिली. संमेलनाच्या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी अभिषेक दातार, सलील दातार, श्रीराम दातार (दातार कुलमंडळ) आदींनी परिश्रम घेतले. दुपारच्या सत्रात जिगीषा ग्रुपच्या‌ नेहा देशपांडे व सहकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनेत्री मधुरा आघारकर - टापरे यांची मुलाखत रंगली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा दातार यांनी केले. संगीता दातार यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !