दि नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित, संस्थेतर्फे वकिलांचा सत्कार

दि नाशिक जिल्हा ॲडव्होकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित, संस्थेतर्फे वकिलांचा सत्कार : 

     नासिक::- दि नाशिक जिल्हा एडवोकेट मल्टीपर्पज सहकारी संस्था मर्यादित या संस्थेतर्फे ४५ वर्षात ज्यांनी संस्थेच्या कार्यकारी मंडळात काम केले त्या सर्वांचा सत्कार संपन्न झाला. सत्कार्थी वकीलांना सन्मानाचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
         यावेळी संस्थेचे संचालक ऍड. पांडुरंग तिदमे यांच्या हस्ते एडवोकेट मिलिंद चिंधडे व सौ. मुक्ता चिंधडे यांचा सत्कार करण्यात आला.     

            उपस्थितांमध्ये आणि ज्यांचे सत्कार झाले त्यांच्यामध्ये ९४ वर्षांचे ऍड. दौलतराव घुमरे यांच्यापासून वकिलीतल्या चार पिढ्या उपस्थित होत्या. त्यामध्ये ऍड. भास्करराव पवार, ऍड. एनजी गायकवाड, ऍड. संतोष गटकळ, नासिक वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे, ऍड. हेमंत गायकवाड, ऍड. वैभव शेटे इत्यादींचा समावेश होता.
         कार्यक्रमात उत्तम गुणांनी दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी ४५ वी सर्वसाधारण सभा संपन्न  झाली. त्यात अनेकांनी क्रियाशील पद्धतीने भाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही