प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

        नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष 
बालकांनी शिवचरित्र समजून घेत स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टींमधून नवे स्वप्न बघितले. स्वतःतील न्यूनगंड दूर करून प्रगती करण्याची प्रेरणा घेतली. प्रेरणादायी गोष्टींमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले.

    रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरतर्फे आज ( दि. १८ ) शिवजयंतीच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गतीमंद विशेष बालकांच्या या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रेरक कथा सांगितल्या. मुलांनी मावळ्यांचा वेष परिधान करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.‌ शिवरायांचा‌ जयजयकार केला. मुलांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे समाधान झाले. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पालकांनीही सहभाग नोंदवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !