सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक (जळगाव)::- मनोज जगन्नाथ मोरे, सहायक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाचोरा उपविभाग २,म.रा. वि. वि.,कार्यालय, जळगाव ( वर्ग २) यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण ३ प्रकरणे तयार करून ऑनलाईन द्वारे आलोसे यांच्या कार्यालयात सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याचा मोबदला म्हणून लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी काल लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल व आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. पाचोरा २ कार्यालय येथे पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे प्रत्येकी ३००० प्रमाणे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टा...