सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक (जळगाव)::- मनोज जगन्नाथ मोरे, सहायक अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाचोरा उपविभाग २,म.रा. वि. वि.,कार्यालय, जळगाव ( वर्ग २) यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण ३ प्रकरणे तयार करून ऑनलाईन द्वारे आलोसे यांच्या कार्यालयात सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याचा मोबदला म्हणून लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी काल लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल व आज दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. पाचोरा २ कार्यालय येथे पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तीन प्रकरणांचे प्रत्येकी ३००० प्रमाणे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून ३००० ऐवजी २५०० रुपये प्रमाणे ७०००० रुपये होतात त्यापैकी तुम्ही ३०००० दिले आहेत व उर्वरित ४०००० बाकी असून त्यापैकी पहिल्या हप्त्याचे आज २०००० व चालूच्या ३ प्रकरणांचे ९००० अशी एकूण २९००० ची मागणी करून २९००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
आलोसे यांनी एकंदरीत ७९,००० ची लाचेची मागणी केल्याचे पडताळणी कारवाई स्पष्ट झाले आहे.
यातील आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध आज करण्यात आलेल्या सापळा कारवाईवेळी आलोसे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. पाचोरा २ कार्यालय येथे तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष मागणी केलेले २९००० /-रु स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपी विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा