दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दोन लाखांची लाच स्वीकारताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक::- जिल्हा परिषद अंतर्गत दिंडोरी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (वर्ग -१) योगेश नारायण घारे व कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव यांना काल २१६०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
         तक्रारदार  हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी सावरपाडा, तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून २१६०००/- रुपये रकमेच्या लाचेची पंचा समक्ष आलोसे क्रमांक एक यांनी मागणी करून आलोसे क्रमांक दोन यांनी अनुक्रमांक एक यांचे  लाच मागणी व स्वीकारण्यास  प्रोत्साहन दिले आहे.
    सदर लाचेची रक्कम  २१६०००/- रु. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दिंडोरी पंचायत समिती दिंडोरी कार्यालयात स्वीकारताना आलोसे क्रमांक एक यांना काल दि. ८ऑगस्ट २०२५ रोजी रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांचे विरुद्ध दिंडोरी पो.स्टे. येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !