सबलांना मानाचा सलाम ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्राध्यापक विजय कोष्टी यांचा लेख

सबलांना मानाचा सलाम !

रविवार८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरवत्यांच्या हक्कांची जाणीव आणि लैंगिक समानतेसाठी ठोस कृतीचा संकल्प - या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा दिवस यंदा मिळवण्यासाठी द्या’ (‘Give To Gain’)या आशयघन विषयावर साजरा होत आहे. या थीमचा अर्थ अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे  देण्यातूनच खऱ्या अर्थाने प्राप्ती होतेसमाजाने जर महिलांना शिक्षणसंधीसुरक्षितता आणि सन्मान दिलातर त्या बदल्यात समाजाला मिळते - प्रगतीसमृद्धीस्थैर्य आणि संवेदनशील नेतृत्व. मिळवण्यासाठी द्या’ हा संदेश केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजासाठी आहे.मुलींना दर्जेदार शिक्षण द्या-राष्ट्राला सक्षम नागरिक मिळतील.महिलांना निर्णयप्रक्रियेत स्थान द्या - धोरणे अधिक समतोल आणि सर्वसमावेशक होतील.समान वेतन आणि समान संधी द्या - अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल.इतिहास साक्षी आहे की जेव्हा स्त्रियांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक दिले आहे. मग ते रणांगण असोप्रशासन असो किंवा अवकाश संशोधन.


इतिहासाचा थोडक्यात मागोवा

१९०८ साली न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर१५ हजार महिलांनी कामाचे तास कमी करणेयोग्य वेतन आणि मतदानाचा अधिकार यासाठी मोर्चा काढला. त्या चळवळीची ठिणगी पुढे आंतरराष्ट्रीय आंदोलनात परिवर्तित झाली. १९१० मध्ये क्लारा जेटकीन यांनी कोपनहेगन परिषदेत जागतिक महिला दिनाचा प्रस्ताव मांडला. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी(United Nations) यांनी अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून दरवर्षी ठराविक थीमसह हा दिवस साजरा केला जातो.

रणांगणापासून अवकाशापर्यंत – भारतीय महिलांची भरारी

आज भारतीय महिला केवळ घरापुरत्या मर्यादित नाहीतत्या निर्णयप्रक्रियेतसंशोधनातप्रशासनात आणि संरक्षण व्यवस्थेत नेतृत्व करत आहेत.

ऑपरेशन सिंदूर - धैर्याची साक्ष

अलीकडील ऑपरेशन सिंदूर” सारख्या संवेदनशील मोहिमांमध्ये भारतीय महिला अधिकारी आणि जवानांनी दाखवलेली तत्परतानियोजन कौशल्य आणि धैर्य विशेष उल्लेखनीय आहे. सीमावर्ती भागातील बचावकार्यवैद्यकीय मदत आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन यात महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान दिले. ही केवळ सहभागाची नव्हे तर नेतृत्वाचीही पायरी आहे.

मंगळ यान -अवकाशात झेपावलेली स्त्रीशक्ती

भारताच्या ऐतिहासिक मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) मोहिमेत महिलांचे योगदान विशेष ठरले. इस्रो (भारतीय अवकाश संशोधन संस्थामधील अनेक महिला वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या नियोजनसॉफ्टवेअर डिझाइनकक्षागणित आणि डेटा विश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावली.या मोहिमेने भारताला जगातील मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा पहिला देश बनवले  आणि त्या यशामागे भारतीय महिलांची बुद्धिमत्ता आणि परिश्रम ठळकपणे दिसून आले.

समानतेकडे वाटचाल – आकडेवारीची भाषा

भारतासारख्या सुमारे १४० कोटी लोकसंख्येच्या देशात जवळपास ४८ टक्के महिला आहेत. तरीही त्यांच्या क्षमतेचा संपूर्ण वापर अजूनही झालेला नाही. शिक्षणआरोग्यरोजगार आणि निर्णयप्रक्रिया या क्षेत्रांमध्ये समानतेची आकडेवारी सुधारत असली तरी गती पुरेशी नाही.लैंगिक समानता’ हा केवळ सामाजिक मुद्दा नाहीतो एक सांख्यिकीय निर्देशांक आहे. उत्पन्नसाक्षरतारोजगार दरआरोग्य सुविधा यातील तफावत कमी झाली तरच खरी प्रगती साध्य होईल. म्हणूनच यंदाची क्रिया गतिमान करा’ ही थीम अत्यंत समर्पक आहे.

सन्मान केवळ शब्दांत नव्हेकृतीत हवा !

महिलांना देवी मानण्याची परंपरा आहेपण त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास न ठेवणे हा विरोधाभास आहे. समानतेच्या गप्पा मारत निर्णयप्रक्रियेत त्यांना डावलणे थांबवले पाहिजे.महिला दिन म्हणजे केवळ फुले देणे किंवा शुभेच्छा पाठवणे नव्हे; तर तो आहे मुलींच्या शिक्षणाचा संकल्प,कार्यस्थळी समान संधीची हमी,सुरक्षित वातावरणाची जबाबदारी आणि नेतृत्वात स्त्री-पुरुष समान सहभागाची प्रत्यक्ष अंमलबजावणी.

रणांगणात धैर्य दाखवणारी सैनिक असोमंगळाच्या कक्षेत झेपावणारी वैज्ञानिक असोकी समाजाच्या प्रत्येक स्तरावर योगदान देणारी गृहिणी , प्रत्येक स्त्री ही प्रगतीची आधारस्तंभ आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपण केवळ गौरवच नव्हे तर कृतीचा निर्धार करूया. स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणजे राष्ट्रशक्तीची वृद्धी होय.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

प्रा. विजय कोष्टी

कवठेमहांकाळ, सांगली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना. 'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन !