गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा (२० मार्च) स्मृतिदिन !

गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा स्मृतिदिन ! सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक गॅ लिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील वूलस्थॉर्प मध्ये झाला . प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता, न्यूटन ची जन्मतिथी २५ डिसेंबर १६४२ म्हणूनही वापरली जाते. त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले . तेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली . गणितशास्त्र , गुरुत्वाकर्षण , गतिशास्त्र , प्रकाश , दृकशास्त्र इ . क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले . १ . गणितशास्त्र : न्यूटन एक श्रेष्ठ गणिती होता . गणितशास्त्रामधील शून्यलब्धी चा शोध त्याने लावला . ( कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला . या शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असत . म्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्या संख्याफ...