गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा (२० मार्च) स्मृतिदिन !

गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ !

अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा स्मृतिदिन ! 

सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी  १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील वूलस्थॉर्प मध्ये झाला. प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता, न्यूटन ची जन्मतिथी २५ डिसेंबर १६४२ म्हणूनही वापरली जाते. त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झालेतेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झालीगणितशास्त्रगुरुत्वाकर्षणगतिशास्त्रप्रकाशदृकशास्त्र इ. क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले.

गणितशास्त्र न्यूटन एक श्रेष्ठ गणिती होतागणितशास्त्रामधील शून्यलब्धी चा शोध त्याने लावला. (कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावलाया शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असतम्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्‍या संख्याफलांचे गणित)सर्वंकष स्वरूपातला बायनॉमियल थिरम ज्याच्या आधारे 'क्षअधिक 'अशा दोन संख्यांच्या बेरजेचा वर्गघन इत्यादी घातांकाचे मूल्य काढता येते.

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत : कोपरनिकसगॅलिलिओ आणि केपलर या शास्त्रज्ञांनी सूर्य आणि ग्रह यांच्या आकाशातील भ्रमणाचे सूक्ष्म निरीक्षण करून सूर्यमालेची कल्पना मांडली होतीतथापि, न्यूटनने सखोल अभ्यास करून त्याला गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची जोड देऊन ते गणिताने  सिद्ध केलेविश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेत्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असा, “विश्वामधील प्रत्येक वस्तूत दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याची शक्ती असतेही शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीही शक्ती वस्तूचे वस्तुमान आणि वस्तू-वस्तूमधील अंतर यावर अवलंबून असते.

गतिशास्त्र न्यूटन ने गतिविषयक तीन महत्वाचे नियम मांडले.

कोणतीही वस्तू आपली स्थिती आपोआप बदलत नाहीती गतिमान होण्यास बाह्यप्रेरणेची आवश्यकता असतेगतीमान वस्तूची गती बाह्यप्रेरणेने न थांबवल्यास ती वस्तू सरळ रेषेत आपली गती कायम ठेवते.

जेव्हा एखाद्या वस्तूवर एखादे बल (प्रेरणाकार्य करते तेव्हा ते त्या वस्तूची गती बदलते आणि हा बदल प्रेरणा जेवढा वेळ कार्य करते त्या वेळेच्या प्रमाणात व प्रेरणेच्या दिशेने होतो.

प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया असतेक्रिया आणि प्रतिक्रिया समान पण विरुद्ध दिशेने होत असतात  

प्रकाशकी (ऑप्टिक्स) : पांढऱ्या शुभ्र सूर्यप्रकाशाचा किरण लोलकातून घालविल्यास त्यात सात रंग असतात हा सिद्धांत त्याने मांडलारंगीत वस्तू विशिष्ट रंगाचे प्रकाशकिरण जास्त प्रमाणात परावर्तित करत असताततो पदार्थ आणि त्यावर पडणारे प्रकाशकिरण या दोन्हींच्या संयोगाने त्याचा रंग ठरतोयाला न्यूटनचा रंगाचा सिद्धांत’ असे म्हणतात.

दृकशास्त्र न्यूटनने अधिक कार्यक्षम दूरदर्शक (दुर्बीणबनविण्यासाठी संशोधन केलेलिलिओ च्या दूरदर्शकातून प्रतिमा रंगीत दिसतन्यूटनने अंतर्गोल बसविलेला परावर्तिनी दूरदर्शक बनवलात्यामुळे प्रतिमेचे रंग नाहीसे होऊन प्रतिमा अधिक स्पष्ट दिसू लागली.


.ग्रंथसंपदा न्यूटचा सर्वात गाजलेला ग्रंथ म्हणजे मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी  १६८७ साली प्रथम प्रकाशित झालात्यानंतर या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व त्यावरील टीकाग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत.

         या ग्रंथामध्ये गतिशास्त्रज्योतिषशास्त्रपदार्थविज्ञान शास्त्र आदी शास्त्रांची चिकीत्सा केली आहेआधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते

ऑप्टिक्स (Opticks)हा न्यूटनचा दुसरा महत्वाचा ग्रंथ होयहा प्रकाशकी वर अवलंबून आहे. ज्यांच्या शास्त्रीय संशोधनामुळे विज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड वेग मिळाला आणि त्यामुळे जगाच्या इतिहासावर किंवा मानवजातीच्या जीवनावर परिणाम करणारी औद्योगिक क्रांती सुरू झालीअशा वैज्ञानिकांमध्ये अजूनही न्यूटनचाच पहिला क्रमांक लागतो. १७०५ मध्ये अ‍ॅन राणीने त्यांना नाईट (सरहा किताब दिलाते २० मार्च (३१ मार्च)१७२७ साली लंडन येथे मृत्यू पावले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।