कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण !

कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण !

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801
          नाशिक ( प्रतिनिधी ) : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्राच्या ( नॅब ) वतीने शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, संस्था आणि शिक्षक व विशेष गौरव पुरस्कार सोहळा पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती पुरस्कार समितीचे चेअरमन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नॅब महाराष्ट्राचे संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       या संदर्भात  माहिती देताना  मुनशेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, नाशिक नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राज्यातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील प्रथम श्रेणीतील विद्यार्थी, विद्यापीठाद्वारे अंतिम पदवी प्राप्त विद्यार्थी, दृष्टीबाधित शाळेत किंवा दृष्टीबाधितांना शिकविणारे दृष्टिबाधित किंवा डोळस विशेष शिक्षक, महाविद्यालयातील दृष्टी बाधित प्राध्यापक, दृष्टीबाधितांसाठी कार्य करणारी संस्था, विशेष कार्य करणारा दृष्टीबाधित व्यक्ती यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 
    दरवर्षी राज्यातील विविध विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नाईस हॉल, सातपूर, नाशिक येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांच्या हस्ते होत असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी नॅब संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री उपस्थित राहणार आहेत. 

      यंदाचे पुरस्कार वितरणाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून या पुरस्काराला राज्य पातळीवर विशेष प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. या पुरस्कार निवड समितीत प्राचार्य अश्विनी कुमार भारद्वाज, प्राचार्य भास्कर गिरीधारी,  के. के. वाघ इंजिनिअर इन्स्टिट्यूटचे डीन प्रा.डॉ. सुनिल कुटे, प्रा.डॉ. सिंधू काकडे, प्रा. विजयकुमार पाईकराव, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कलाल, समिती सचिव म्हणून संपत जोंधळे यांनी काम पाहिले. 
         सर्व पुरस्कार लोकसहभागातून दिले जातात. त्यामुळे अनेक मान्यवरांनी याकरिता आर्थिक सहाय्य केले आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शालेय, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व सर्व विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले आहे. राज्यातून विविध भागातून निवड केलेले प्राध्यापक, विशेष शिक्षक, संस्था, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारी व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.असे गोपी मयूर यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !