पोस्ट्स

रासपच्या विदर्भ कार्यकर्ता मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती ! विरोधकांना दखल घेण्यास भाग पाडणारा यशस्वी मेळावा-आयोजक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नागपूर::-राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित विदर्भ कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे मोठया थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाला  विदर्भातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, भाजपा नेते आमदार नरेंद्र पवार जिल्हा महामंत्री राजुभाऊ पा.तकर, रासप युवक आघडी अध्यक्ष राजे भाऊ फड, मुख्य महासचिव रासप बाळासाहेब दौडतले व रासपचे सर्व नेते मंडळी यांची ही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. मेळाव्यात पक्षाची पुढील वाटचाल याबाबत विचारमंथन करण्यात आले,  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणासोबत विरोधकांनी दखल घेण्यास भाग पडावे असा हा मेळावा ठरल्याची चर्चा विदर्भ मराठवाड्यासहीत महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात होत आहे,  या कार्यकर्ता मेळाव्या मध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी  प्रा.सौ. माधुरी ताई पालीवाल व यु

१६ व १७ जानेवारीला निर्धार परीवर्तनाचा यात्रा जिल्ह्यात येत असुन यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक दि. ११ (प्रतिनिधी):-  येत्या १६ व १७ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात येणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.        नाशिक जिल्ह्यात दि. १६ व १७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे घेण्यात आली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ बोलत होते.         शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीद वाक्य घेऊन परिवर्तन यात्रा काढत आहे. येत्या दि.१६ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यात सिन्नर, घोटी, ता.इगतपुरी व नाशिक शहरात तर दि. १७ जानेवारी रोजी दिंडोरी, सायखेडा, ता.निफाड व मनमाड, ता. नांदगाव येथे होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ, आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.सुप्रिया सुळे, आ.दिलीप वळसे पाटील, आ.सुनिल तटकरे, आ.जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या बैठकीत नाशिक ज

विहित कालमर्यादेत कामे पूर्ण न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे नियोजन ! वाँटरकप स्पर्धेत सर्व गावांनी सहभाग घ्यावा - नामदेव नन्नावरे!! डासमुक्तीसाठी अभियान राबविण्याचा डाँ.नरेश गिते यांचा मानस !!! गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत राज्यात पहिल्या पाच मध्ये जिल्ह्याची वर्णी, ९४ टक्के लसीकरण पूर्ण !!!! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
विहित कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा ! नाशिक – जिल्हा नियोजन विकास आराखडयाच्या बैठकीनंतर निधी अखर्चित मु्द्यावरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी रुद्रावतार धारण करत बांधकाम, लघु पाटबंधारे विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांकडे आपला मोर्चा वळवला आहे. या विभागांकडून प्रत्येक कामाची तारखेनिहाय माहिती घेण्यात येत असून काम विहित कालमर्यादेत पुर्ण न झाल्यास व निधी खर्च न झाल्यास पाचही विभागातील सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्याचा इशारा डॉ. गिते यांनी दिला आहे.       विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अखर्चित निधीवरुन चर्चा झाली होती तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम व लघु पाटबंधारे विभागाच्या कामकामाजाबाबत चर्चा होवून कामांच्या दिरंगाईस कारणीभूत असणा-यांवर कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. नरेश गिते यांनी या पाचही विभागांच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून कामांच्या मंजुर दिनांकापासून ते ई टेंडर, कार्यारंभ आदेशपर्यतच्या प्रवासाची तारखेनिहाय माहिती घेण्यात

नेट परीक्षेत प्रा.योगिता भामरे उत्तीर्ण, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक::-गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी.डी.सावंत महाविद्यालयाच्या प्रा. योगिता भामरे-अहिरराव नेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.        १९ डिसेंबर रोजी झालेल्या नँशनल टेस्टींग एजन्सी अंतर्गत युजीसी मराठी विषयात उत्तीर्ण झाल्या असुन त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे, त्यांना डाँ.दिलीप पवार, डाँ.सुरेखा जाधव, डँ. किरण पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले असुन यापूर्वी सेट परीक्षेत यश मिळविले आहे. संस्थेचे अध्यक्ष बी.बी.चौरे, सचिव अशोक सावंत, प्राचार्य डाँ.यु बी.पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यकारी अभियंता यांनी केली दिलगीरी व्यक्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक::-मनपाचे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन करीता वीज पुरवठा करणाऱ्या लाईनवर कार्बन नाका येथे कनेक्टिंग जम्प तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झालेला होता.  तसेच त्यामुळे गंगापूर डॅम जवळील वीज वितरण कपंनीच्या फोर पोल स्ट्रक्चर मधील कनेक्टिंग जम्प तुटलेला होता.  त्यामुळे सदरची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याने दि. १० जानेवारी रोजी  सकाळी  ७ ते ९:३० वाजेपावेतो गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथे वीज पुरवठा खंडीत झाल्याने पंपींग होऊ शकलेले नाही.    त्यामुळे दि. १० जानेवारी रोजीचा संपूर्ण नाशिक शहरातील सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत  झाला.   याबद्दल कार्यकारी अभियंता (यां) मनपा नासिक यांनी दिलगीरी व्यक्त करून जबाबदारी पार पाडली आहे.

रेडीमिक्स च्या टिझर ची मोहीनी ! प्रचंड क्रेझ निर्माण करण्यात होतोय यशस्वी ! फेसबुक, इन्ट्राग्राम, ट्विटरवर ९ जानेवारीपासुन घोडदौड सुरूच !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सचिन खेडेकरांचा ‘ रेडीमिक्स ’ टिझरला आवाज!  ‘ रेडीमिक्स ’ टिझर सोशल मीडियावर! अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित ' रेडीमिक्स ' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा 'टिझर' म्हणजे ‘ पहिली मुख झलक ' सोशल मीडियावर रसिकांसाठी आज प्रदर्शित झाली. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत? आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे? हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या 'टिझर'ने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. ‘एव्हीके फिल्म्स’चे अमेय विनोद खोपकर प्रस्तुत 'र

सार्थ निवड ! समाजाप्रती संवेदनशील असलेल्या इंजि. माळेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा !! मा.राज्यपाल यांच्या आदेशाने उपयोजना नियोजन समितीपदी निवड !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समिती सदस्यपदी इंजिनिअर विनायक माळेकर यांची निवड.         नाशिक ::-जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समिती सदस्यपदी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवा नेते इंजिनिअर विनायक माळेकर यांची  मा. राज्यपाल यांच्या आदेशाने निवड झाली आहे. युवा नेते विनायक माळेकर यांच्या निवडीने त्र्यंबकेश्वर हरसूल येथील त्यांच्या समर्थकां मध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.              नासिक जिल्हा परिषदेच्या हरसूल गटातून माळेकर यांच्या पत्नी प्रा. इंजि. सौ. रुपांजली माळेकर या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या असून  त्यांच्या आई श्रीमती ताराबाई  माळेकर  या आदिवासी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य संचालिका  सोबत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालिका म्हणून काम करत आहेत. तसेच विनायक  माळेकर हे महाराष्ट्र इंजिनिअर संघटनेचे  कोषाध्यक्ष आहेत.           जिल्हा आदिवासी उपयोजना नियोजन समितीवर कामाची संधी दिल्याबद्दल माळेकर यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा , पालकमंत्री गिरीश महाजन, आम. बाळासाहेब सानप, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांचे आभार मानले आहे.