पोस्ट्स

वरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या आणखी एका ग्रामसेवकाचे झाले निलंबन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    दिंडोरी तालुक्यातील पुन्हा एका ग्रामसेवकाचे निलंबन ! वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर का केली जाते? याचे परिक्षण केल्यास फक्त ग्रामसेवक जबाबदार असेल की आणखी कुणी ! दप्तर दिरंगाई वा तपासणीस उपलब्ध न करून देणे यांत भ्रष्टाचाराला वाव असल्याच्या चर्चेने दिंडोरी तालुक्यात बोलले जात असुन ग्रामसेवक हा जबाबदार  प्रशासनाचा प्रतिनीधी असतो म्हणून कारवाई तेथपर्यंत येऊन थांबते मात्र पडद्यामागील अशासकीय सूत्रधारांचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे ! ============================= नाशिक – ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कर्तव्यात कसुन केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी ही कार्यवाही केली. दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय काम करीत असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवहया व

नासिक च्या होतकरू उद्योजकांना बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस उपक्रमांतर्गत मार्गदर्शनाची संधी ! ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम !! बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा !!! सविस्तर माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक: नाशिक येथील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत म्हणून गत १० वर्षांपासून नाशिक आंत्रप्रिनर फोरम " बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस " हा उपक्रम राबवत असून, यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम दि. ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर वार्षिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संजय लोढा, हर्षद मेहता आणि अजय बोहोरा यांच्या कडून करण्यात येणार आहे. नाशिक आंत्रप्रिनर फोरमने गेली अनेक वर्षे बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला असून त्याचा फायदा नाशिक मधील होतकरू तरुण उद्योजक घेत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी आपले उद्योग उभे केले असून यशस्वीरीत्या चालवत आहेत. या पुढेही अनेक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून नाशिक आंत्रप्रिनर फोरम प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे सलग १० वे वर्ष आहे

कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
       नाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.        मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्रारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज प्रथम प्राधान्य या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्ट् जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आह

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली, ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आज खाजगी शाळेतील १९ अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली.       विभागात अतिरिक्त ठरलेल्या खाजगी शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी संबंधित शिक्षकाना समुपदेशनाने पदस्थापना दिली. ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी नाशिक-  जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. शासन निर्णयानुसार १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदोन्नती समितीसमोर ८६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते

वरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रशन सोडविण्याचा धडाका कायम ठेवत सामान्य प्रशासन विभागांतर्गत सेवाजेष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या जिल्हयातील ११ वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. या ११ कर्मचा-यांना जिल्हयातील तसेच मुख्यालयातील रिक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची सुत्र घेवून एका वर्षाच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी प्रशासकीय सुधारणांबरोबरच कर्मचा-यांना विविध प्रकारचे लाभ वेळेत देण्याचे निर्देश देवून याबाबत स्वत: पाठपुरावा केला आहे. आतापर्यत जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचा-यांना पदोन्नती, १२ व २४ वर्षाची कालबध्द पदोन्नती, स्थायित्व प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे लाभ मंजुर केले

आम्ही भारतीय कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कुणी गेलं तर त्याला सोडत नाही- खा.शरद पवार ! शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले !! देशाच्या सीमेवर सैन्य लढत आहे अन् मोदी राजकारण करीत आहेत-आम. छगन भुजबळ !!! कार्यकर्ता संवाद मेळाव्याची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी  खंबीरपणे उभे रहा - खा.शरदचंद्र पवार नाशिक,दि.४ मार्च:- छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडे नाशिकची संपुर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणलेल्या शेतकरी विरोधी भाजप सरकारला हद्दपार करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी केले. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रशांत हिरे, समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, रंजन ठाकरे, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, ऍड.संदीप गुळवे, बापू भुजबळ, गजानन शेलार, अमृता पवार, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, हिरामण खोसकर, शिवाजी सहाणे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, बाळासाहेब वाघ, राजाराम धनवटे, बाळासाहेब गाढवे, बहिरू मुळाने, अनि

करन गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीच्या घोषणेने प्रस्थापितांमध्ये संभ्रमाचे वातावरण ! तरूण, हरहुन्नरी, सामाजिक जाणीवेच्या चेहऱ्याने घेतलेल्या आघाडीचीच चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी करण गायकर यांची उमेदवारी निश्‍चित ! समाजातील सर्व स्तरातून मिळालेल्या पांठिब्यानंतरच उमेदवारीचा निर्णय जाहीर !! ========================== छावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा ठसा महाराष्ट्रांत उमटविणारे व त्याचबरोबर मराठा आरक्षण , कोतवाल आंदोलन , केबीसी गुंतवणूकदारांचे प्रश्न , आदीवासी समाजाच्या मागण्यांसाठीचे सक्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्पावधीत लोकप्रिय झालेले संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीने नासिक मधील राजकीय गणितांची समीकरणे बदलाचे वारे प्रवाही झाले आहे , निवडणुकीची तारीख जवळ येत असतांना प्रस्थापित राजकारण्यांचे ठोकताळ्यांना गायकरांच्या सर्वात प्रथम उमेदवारीच्या  घोषणेने एका नवीन आव्हाणाला सामोरे जावे लागण्याचा मोठा प्रश्न   निर्माण केला आहे अशी चर्चा नासिक लोकसभा मतदार संघात होत आहे. ========================= नाशिक ::-शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात विकासाला प्रचंड वाव असलेला नाशिक जिल्हा केवळ राजकीय अनास्थेपायी देशातील प्रगत शहरांच्

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महीला नेत्याविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी करणार्यावर पोलीसानी तत्काल कारवाई करावी!! - प्रेरणा बलकवडे. सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
नाशिक दि. १ (प्रतिनिधी):  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यांविरोधात होणाऱ्या सोशल मिडियावरील   आक्षेपार्ह विधानाबाबत तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्ठमंडळाने भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक येथे तक्रार दिली. निवेदनात सौ बलकवडे यांनी म्हटले आहे की “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्यांवर सोशल मिडियावरून आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे तसेच महिलांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचे प्रकार सोशल मिडीयावर काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात शिल्लक राहिलेली महिलांबद्दलची अशी र्निबुद्ध मानसिकता वेळीच कारवाई करून थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. असाच काही प्रकार जालना जिल्ह्यातील एका  इसमाने पक्षाच्या महिला नेत्यांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करून केलेला आहे.” त्या संदर्भातील पुरावे व सोशल मिडियावरील स्क्रीन शॉट (पुर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
धुळे::- राष्ट्रवादी काँग्रेसच्या साक्री तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची निवड झाल्या बद्दल  धुळे जिप. अध्यक्ष  शिवाजीराव दहिते यांनी मराठेंचा सत्कार केला.                     सत्काराला उत्तर देतांना, जिल्हा कार्यकारिणीने एकमताने केलेली माझी निवड व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेरणेने मिळालेली जबाबदारी पार पाडण्याचे तसेच पक्ष संघटन व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करेन असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी सांगीतले.              या सत्कार सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे . साक्री तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष . विलासराव बिरारीस ,  माजी जिप. सदस्य उत्तम राव देसले हे उपस्थित होते, त्या सर्वांनी जितेंद्र मराठे यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुर्वीची खाद्यसंस्क्रुती टिकविण्याचे काम महीला स्वयंसहाय्यता गटांकडून टिकविली जात असुन या चळवळीला अधिक गती द्यायला हवी-नाम.शितल सांगळे ! महिलांमध्ये परीवर्तनाची ताकद असून देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रीय सहभाग महत्वाचा-पोलीस अँकेडमी संचालक अश्वती दोरजे !! ४ मार्च पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
       नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परीषद अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.        कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त सुखदेव बनकर, प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर, शिक्षण सभापती यतीन पगार, जि.प.सदस्य नितीन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे आदी उपस्थित होते.          यावेळी बोलताना श्रीमती सांगळे म्हणाल्या, लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत नेले आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारून  या गटांची वाटचाल स्वावलंबन