राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महीला नेत्याविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी करणार्यावर पोलीसानी तत्काल कारवाई करावी!! - प्रेरणा बलकवडे. सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

नाशिक दि. १ (प्रतिनिधी):  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यांविरोधात होणाऱ्या सोशल मिडियावरील
  आक्षेपार्ह विधानाबाबत तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्ठमंडळाने भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक येथे तक्रार दिली.
निवेदनात सौ बलकवडे यांनी म्हटले आहे की “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्यांवर सोशल मिडियावरून आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे तसेच महिलांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचे प्रकार सोशल मिडीयावर काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात शिल्लक राहिलेली महिलांबद्दलची अशी र्निबुद्ध मानसिकता वेळीच कारवाई करून थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.
असाच काही प्रकार जालना जिल्ह्यातील एका  इसमाने पक्षाच्या महिला नेत्यांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करून केलेला आहे.” त्या संदर्भातील पुरावे व सोशल मिडियावरील स्क्रीन शॉट (पुरावे) माहितीस्तव सोबत कारवाईकरीता त्यांनी पोलीसाना दिलेल्या निवेदनासोबत जोडून दिले.  या संदर्भात तातडीने तक्रार दाखल करून सोशल मिडीयावर  केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यांची शहनिशा करावी. तसेच महिलांप्रती अशी कलंकित भावना ठेवणाऱ्या आरोपीवर नियमानुसार तातडीने योग्य कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.
या वेळी पुष्पलता उदावंत, सायरा शेख, निलीमा काळे, नुरजहां मन्सुरी, बिना हाडा आदींसह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !