पुर्वीची खाद्यसंस्क्रुती टिकविण्याचे काम महीला स्वयंसहाय्यता गटांकडून टिकविली जात असुन या चळवळीला अधिक गती द्यायला हवी-नाम.शितल सांगळे ! महिलांमध्ये परीवर्तनाची ताकद असून देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रीय सहभाग महत्वाचा-पोलीस अँकेडमी संचालक अश्वती दोरजे !! ४ मार्च पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

       नाशिक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परीषद अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस ॲकेडमीच्या संचालक अश्वती दोरजे, उपायुक्त सुखदेव बनकर, प्रतिभा संगमनेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण सभापती सुनिता चारोस्कर, शिक्षण सभापती यतीन पगार, जि.प.सदस्य नितीन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे आदी उपस्थित होते.
         यावेळी बोलताना श्रीमती सांगळे म्हणाल्या, लहान गावातल्या महिलांनी बचत गट चळवळीला मोठ्या शहरापर्यंत नेले आहे. नवे तंत्रज्ञान स्विकारून  या गटांची वाटचाल स्वावलंबनाकडे सुरू आहे. महिला बचत गट चळवळीत मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग अभिमानास्पद असून यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे. बचतगटांमार्फत महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत असल्याने महिला बचतगटांना प्रोत्साहन देवून त्यांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांचे मेळाव्यांचे आयेाजन हे उपयुक्त ठरणार आहे. महिला स्वयंसहाय्यता समुहांनी जुनी खाद्यसंस्कृती टिकवली आहे. महिलांनी एकत्रित प्रयत्न करून या चळवळीला अधिक गती द्यावी आणि आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
            प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी मेळाव्याच्या उददेशाबाबत माहिती देत मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण वस्तुंची वाजवी दरात विक्रि होवून ग्राहकांचा व बचतगटांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. तसेच महिला बचत गटांनी कुपोषण निर्मुलन, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच शौचालयाचा नियमित वापर होणेसाठीही काम करण्याचे आवाहन केले.
             महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्विती डोरजे यांनी महिलांमध्ये परिवर्तनाची ताकद असून देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. महिलांनी संघटीत होऊन ध्येयाकडे वाटचाल करायला हवी. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे कौशल्य बाहेर आल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीतही सुधारणा होईल. देशातील 28 टक्के महिला उत्पादन क्षेत्राशी संबंधीत असून हे प्रमाण 38 टक्क्यापर्यंत पोहोचल्यास  उत्पादनात 700 अब्ज डॉलर्सची वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. पोलीस कुटुंबातील महिलांना संधी मिळवून देण्यासाठी त्यांच्या गटाने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
            विभागीय कार्यालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांनी महिला बचत गटांच्या कामांबाबत मार्गदर्शन करताना बचतगट हे संस्कारपीठ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन होते, त्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळते. दशसूत्रीमुळे व्यवसायापलिकडे महिलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी मदत होते.  शासानाने बचत गटाच्या उत्पादनाला बाजार मिळवून देण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बचत गटांनी उत्पादनात नाविन्य आणून स्पर्धसाठी सक्षम बनावे,असे आवाहन त्यांनी केले.
          तत्पूर्वी श्रीमती सांगळे यांनी प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन करून गटातील महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा मठकरी यांनी केले.
==========================           ==========================
दोनशे स्टॉल्सद्वारे विविध प्रकारच्या वस्तु उपलब्ध
           २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१९ या कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात प्राधान्याने नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर व राज्यातील अन्य विभागातील स्वयंसहाय्यता गटांव्दारे उत्पादीत केलेल्या नाविन्य पुर्ण उत्पादने, गारमेन्ट, कलाकुसरीच्या वस्तु. इर्बल प्रोडक्ट, वन औषणी, ग्रामीण हस्तकलेच्या वस्तु, आर्युवेर्दिक उत्पादने, विविध कलात्मक वस्तु, गृहोपयोगी वस्तु, विविध रुचकर खाद्य पदार्थ तसेच शासनाच्या विविध योजनांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले आहेत
           प्रदर्शनात अडीचशे स्टॉल्स असून आतापर्यंत दोनशे स्टॉल्समध्ये वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारपासून सहभागी बचत गटांची संख्या आणखी वाढणार आहे. धुळे जिल्ह्याचे २२, नंदुरबार १६, जळगाव १८, अहमदनगर २० आणि नाशिक जिल्ह्याचे ११० स्टॉल्स आहेत. यात १३३ स्टॉल्स विविध उत्पादनांचे तर ४७ स्टॉल्स खाद्यपदार्थांचे आहेत. इतर शासकीय विभागांनी देखील प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. बचत गटांनी तयार केलेल्या सुंदर गोधड्या, कांबळ, पर्स, शोभेच्या वस्तू, गृहपयोगी वस्तू, पापड-कुरडाया, मसाल्याचे पदार्थ, सेंद्रीय पदार्थ, द्राक्षे, तांदूळ, डाळ, तयार कपडे, पैठणी, लाकडी वस्तू, हस्तकलेच्या वस्तू, आयुर्वेदीक उत्पादने, सजावटीच्या वस्तू आदी  विविध उत्पादनांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने  बचत गटांच्या उत्पादनांसाठी ‘गोदाई’ ब्रँड विकसीत केला आहे. याच नावाने बहुतेक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शन ४ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या  वेळेत सुरू रहाणार आहे. नागरिकांना रास्त किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करण्याची चांगली संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !