पोस्ट्स

शहराच्या सौंदर्यात भर व शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी या उदात्त हेतूने एसकेडी ग्रुपने सहभाग नोंदवत रस्ता सुशोभीकरण कामाचा केला उद्घाटन सोहळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एसकेडी ग्रुप च्या वतीने भोसला मिलिटरी स्कुल गेट ते दूधवाला कॉर्नर रस्ता सुशोभीकरण  उद्घाटन सोहळा संपन्न झाला.      नासिक (१५)::-केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नासिक शहराची निवड झाली आहे, शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असे जर प्रत्येकाने ठरवले तर कधीच ते शहर स्वच्छ व सुंदर होऊ शकत नाही, सर्वांचा सहभाग असला तरच हे शक्य होईल, यासाठी आपले आपल्या शहरासाठी चे योगदान असावे, शहराला सामाजिक, व्यावसायिक दर्जा प्राप्त व्हावा व जागतिक पातळीवर एक विशिष्ट ओळख निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने नासिकच्या सुप्रसिद्ध एसकेडी ग्रुप ने महात्मानगर येथील भोसला महाविद्यालय ते दुधवाला काॅर्नर हा रस्ता सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, सुंदर व सुशोभित करण्यात येत असलेल्या कामाचे उद्घाटन निमंत्रितांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नाशिक महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते , माजी स्थायी सभापती सौ.हिमगौरी आहेर-आडके,  नगरसेविका सौ.राधाताई बेंडकुळे, विष्णूपंत बेंडकुळे, नगरसेवक योगेश हिरे, एसकेडी ग्रुप चे संचालक संजय देवरे व सौ.मीना देवरे, अंकुर सुराणा, पोपट देवरे व एसकेडी

महाराष्ट्रातील जाणकार मान्यवरांच्या उपस्थितीत सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना ! विश्वकर्मा पूजन दिनी तमाम समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना !        नासिक::- काळ बदलला तशी सामाजिक परिस्थिती बदलत गेली, बारा बलुतेदारांच्या व्यवसायात ही स्थित्यंतरे झाली, शिक्षणाचं विकेंद्रीकरण झाले परंतु सर्वांना वेळीच हा बदल आत्मसात करता आला नाही याचा परिणाम समाजावर कालानुरूप होत गेला. समाजातील अनेक जातीधर्माच्या कुटुंबांना पिछाडीवर टाकत असताना काही जाणकारांनी वेळीच लक्ष देऊन समाज संघटित करून भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. तसाच सुतार समाज यांत्रिकीकरणाचा बळी पडून पारंपरिक व्यवसायासही मुकत चालला असून त्याला भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नासिक मध्ये सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना सुतार समाजातील जाणकारांकडून करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिनी या संस्थेची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे,  मे. धर्मादाय आयुक्त, नासिक येथे नोंदणी  केली असून राजे छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील मायको फोरम हाॅल येथे विश्वकर्मा पूजन दिनी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सुतार समाजातील सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माह

छावा क़ांतीवीर सेनेचा झंझावात ! इगतपुरी तालुक्याची कार्यकारिणी गठित ! नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात बहुसंख्येने कार्यकर्त्यांचा उत्साहात प्रवेश सोहळा पार पडला !!! उत्तर महाराष्ट्रातील बातमी मागच्या बातमीसाठीचे एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
इगतपुरी तालुका कार्यकारणी निवड, छावा क्रांतीवीर सेनेत शेकडो तरुणांचा प्रवेश.        नासिक (१५)::- छावा क्रांतीवीर सेना नाशिक यांच्यावतीने काल इगतपुरी तालुक्यातील नवीन पदाधिकारी नियुक्ती, संघटनेच्या नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत नियुक्त्या देण्यात आल्या, यावेळी उमेश शिंदे यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी व नवनियुक्त प्रवेश घेणाऱ्यांना संघटनेच्या ध्येय धोरणांची, संघटनेच्या वाटचालीचा सविस्तरपणे आढावा मांडून छत्रपती शिवराय यांच्या आचार, विचारांवर प्रेरित होऊन करण गायकर यांच्या सह प्रदेश कार्यकारणी यांनी वाढवलेल्या या संघटनेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून चागले काम उभे करू शकतो, असा संदेश देऊन सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना, महिलांना, बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला पाहिले असे आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या. यावेळी संस्थापक करण गा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांना तत्त्वता मान्य केल्याने राज्यातील बावीस हजार ग्रामसेवकांच्या प्रश्नांसंदर्भात सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाची सांगता ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनकडून प्रलंबित तसेच विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू होते, ग्रामसेवकांच्या मागण्यांना ठोस नाही मात्र तत्त्वता मान्य करण्यात आल्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती ग्रामसेवक युनियन चे पदाधिकारी वाघचौरे यांनी दिली. प्रामुख्याने मासिक प्रवास भत्ता १५००/- रुपये करणे, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अहर्तामध्ये बदल करणे व पदोन्नतीच्या पदांमध्ये वाढीव पदांचा समावेश करणे,  या मागण्यां संदर्भात शासन सकारात्मक असल्याची चर्चा होऊन आज संघटनेमार्फत सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेतले असून सुमारे २२ हजार ग्रामसेवक आजपासून कामावर हजर होत आहेत.

डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी थांबणे - अवर सचिव प्रियदर्शन कांबळे !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                 डॉक्टर , शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी थांबले बंधनकारक करण्यात आले आहे, तसा शासन निर्णय असतांनाही मुलांचे शिक्षण  वा तत्सम कारणे दाखवून तालुका जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत आदेश पारित केला आहे अशी माहिती राज्य शासनाचे अवर सचिव प्रियदर्शन कांबळे यांच्याकडून देण्यात आली. सदर शासन निर्णयानुसार आता डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांचे धाबे दणाणले असून, राज्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे, त्यांनी त्यांची अंमलबजावणी करणे व शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास यांत समाधानकारक प्रगती साधण्यासाठी या शासन निर्णयानुसार नेमणुकीच्या ठिकाणी मुक्कामी नसणाऱ्यांना आदेशित करून सुधारणा करावी.

मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत….. ! छावा क़ांतीवीर सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ! सदर पत्र जसेच्या तसे प्रकाशित करून दिले आहे, सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जा.क्.१०४७/२०१९    दि.११/०९/२०१९ प्रति मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई विषयः- मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत….. महोदय, चला घेऊ शिवरायांचा आशीर्वाद ..अशी भावनिक साद घालून आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशापातळीवर सत्ता प्रस्थापीत केली.तथापी सत्तेचे इप्सीत साध्य झाल्यानंतर देश घडविणाऱ्या छञपतींच्या तरूण वारसादारांचे हक्क पायदळी तुडविण्याचा विडा आपले शासन आणि प्रशासनाने उचलला असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे  हक्क देतांना आपले शासन आणि प्रशासन आकस बुध्दीने सुडाची भावना बाळगत आहे आसा आमचा ठाम समज झाला आहे.हा समज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या देतांना घेतलेल्या भुमिकेमुळे आपणच अधोरेखीत केला आहे. महोदय,  गेली चाळीस मराठा समाज आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीत आहे.  दोन वर्षापुर्वी हा संघर्ष शिगेला पोहचल्यानंतर ५८मोर्च आणि ४३ समाजबांधवांनी आत्मबलिदान आणि  ८० वकीलांची फौज मराठा समाजाने उभी केल्यानंतर आरक्षण पदरात पडले.शासन

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धेचे एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बातमीत दिलेल्या संपर्क नंबरवर नोंदणी करून सहभाग नोंदवावा !! यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार !!! अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धा.            नाशिक (प्रतिनिधी)::- येथील एस.के.डी. चॉरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा संवाद लेखन वाचन आत्मविश्वास कौशल्य विकसित व्हावे या उदात्त हेतुने एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हातील महाविद्यालयांतील विदयार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत, कर्मवीर शांताराम बापू वावरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिडको, नासिक मध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन केलेची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. सदर स्पर्धेचे विषय, मोबाईलमुळे वाचन व संवाद हरवला आहे ?, शिक्षणाचं खरंच बाजारीकरण झाले का?, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील का? ,  शिक्षणातुन समाज परिवर्तन ! आदी चार विषयांवर स्पर्धा घेण्यात येणार आहे . प्रथम, द्वितीय, तृतिय, तसेच उत्तेजनार्थ विशेष बक्षीस व रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मान

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा ! जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भरभराट होवो व सुखसमृद्धी लाभो - जिल्हा परिषद अध्यक्ष !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा !           नासिक (११)::- जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात सहभागी होत असतात. सालाबादप्रमाणे अध्यक्षांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. याही वर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष नाम. शितल ताई सांगळे सह श्री. उदय सांगळे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली, यावेळी गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना नाम. सांगळे यांनी जनतेच्या आरोग्याची व शेतकऱ्यांची समस्याविरहित भराभराट होवो व सुखसमृद्धी लाभो अशी भावना व्यक्त केली.   यावेळी उपाध्यक्ष नयनाताई गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनिषा ताई पवार, समाजकल्याण सभापती  सुनिता ताई चारोस्कर, सदस्य संजय बनकर, उदय जाधव, जिल्हा परिषद सरकारी व सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, जी. पी. खैरनार,  चंद्रशेखर वडघुले,  रविंद्र देसाई, सचिन पाटील, अनिल ससाणे, दत्तात्रेय मदने, अजित आव्हाड, मधुकर पुंड, तसेच  चेतन ठाकूर, सागर सोनवणे, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचा एल्गार !मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

इमेज
कर्मचाऱ्यांचा एल्गार ! मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कालच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात देण्यात आला !          नासिक (९)::- राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी   एकदिवसीय लाक्षणिक संप करून शासनाला मागण्यांसाठी जिल्हास्तरावर निवेदने देण्यात आली. कालच्या लाक्षणिक संपात नासिक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेत सहभागी होत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.          पुणे येथे २५ आॅगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गातील संघटनेच्या प्रमुखांची व प्रतिनिधींनी राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली व संघटनांच्या सर्व समावेशक,समान मागण्यांसाठी समन्वय समिती स्थापन केली होती. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल सर्व संघटनांनी एकत्र येऊन लाक्षणिक संप पुकारला यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.           कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा

ट्रोल कशावर केव्हा करायचा ? कुणावर करायचा ? आपली लायकी किती ? सात रूपयांत एक रोटी मिळत नाही तुमच्याकडे !! भारतीय मिडिया व सर्वधर्म समभाव नीतीने चालणारी जनता आजही सभ्यता टिकवून आहे !!! ट्रोल करणाऱ्याला त्याच्याच भाषेत मात्र सभ्यतेत दिलेले उत्तर सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
भारतीय मिडिया ने व भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जपत जी वाटचाल सुरू ठेवली आहे ती जगाला भुरळ घालणारी ठरत असताना शेजारील देशातील राजकारण्यांनी सडकछाप प्रतिक्रिया नोंदवली तीचे पडसाद "पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी" बघायला मिळत आहे. भारताची चांद्रयान-२ मोहीम शेवटच्या टप्प्यात पोहचली असताना विक्रम लॅंडर चा बंगळुरूस्थित इस्त्रोच्या लॅबशी संपर्क तुटला मात्र विक्रमला वेगळं करणारे आर्बिटर व्यवस्थित कार्यरत आहे. थोडक्यात भारताची चांद्रयान मोहीम खूप किंवा पूर्णतः अपयशी ठरलेली नाही. यापूर्वी सन २००८ मधील चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली होती, तीचा उद्देश सफल झाल्यानंतर चंद्रावरील पाणी व इतर माहिती मिळविण्याचे पुढचे पाऊल म्हणून या मोहीमेकडे पाहीले जाते.            शेजारील देश पाकीस्थान आपल्या अकलेचे तारे तोडत आहे, यांत प्रामुख्याने पाकीस्थानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी आघाडीवर आहेत, ९०० कोटी रुपये खर्च करायची भारताला काय आवश्यकता होती, विरोधी पक्षांनी यांचा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला पाहिजे, त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा "मोलाचा" सल्लाही ट्विटरद्वारे