न्यूज मसाला स्पेशल,. आँनलाईन सभा तहकूब एक शोकांतिका !! सविस्तर न्यूज मसाला स्पेशल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
न्यूज मसाला स्पेशल , शोकांतिका-आॅनलाईन सभा तहकूब ! नासिक::-आँनलाईन सभा तहकूब करण्यात आली, या बातमीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी समर्थन केले. समर्थन करणाऱ्यांनाही स्पष्ट व खंबीरपणे भूमिका सादर करता आली नाही. कोरोना जागतिक महामारी आहे, हे संकट भयानक रूप धारण करू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने नेहमी सूचित करण्यात येत आहे तरीही कुणी हट्टाला पेटून समाजाचं तसेच स्वत:चे नुकसान करून घेणार असेल तर अशांना काय उपमा देता येईल ? ज्यांचा उदरनिर्वाह आपले अस्तित्व विसरून करीत आहेत, आजच्या परिस्थितीला, उपासमारीच्या संकटाला तोंड देत आहेत, तेथे सभागृहात सभा घ्यावी असा आग्रह करणारे यांना काय उपमा देता येईल ? न्यायालयात सुरु असलेल्या सुनावण्या आँनलाईन होत आहेत, एका प्रकरणात आँनलाईन कागदपत्रे सादर करणे शक्य नाही असे राज्यसरकारच्या वतीने न्यायालयाला सांगितले जाते तेथेही निर्णय प्रलंबित ठेवण्यात येतो, देशाचे पंतप्रधान, राज्य सरकारे, तसेच प्रशासकीय पातळीवर सर्वच आँनलाईन सभा घेत आहेत, यावरून तरी आँनलाईन व आॅफलाईन सभेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.