आजीबाईंच्या निधनानंतर नातू हार्दिक निगळ याने कशाप्रकारे वाहीली श्रद्धांजली !! , , सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! ,

प्रकाश उखाडे यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
कष्टप्रद ‘आजीबाईं’ च्या निधनानंतर आपल्या शेतातच अस्थिविसर्जन व वृक्षरोपणाने जपल्यात आठवणी..!’
        नासिक::- काळी आई धन धान्य देई..म्हणूनच आपल्या मायभुमीवर प्रेम अन् सतत कष्ट करता-करता मायभुमीमुळेच आपले जीवन सफल झाले..आज सारंच कुटूंब गुण्यागोविंदाने जीवन जगत आहे..ते केवळ आपल्या आजीबाईंमुळेच..म्हणून आजीबाईंच्या निधनानंतर आठवण कायम रहावी यासाठी म्हसरूळच्या निगळ कुटूंबाकडून अस्थिविसर्जन कुठल्याही तीर्थक्षेत्री न करता आपल्याच शेतात खड्डे खोदून अस्थि विसर्जनासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करून आजीबाईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.             आजीबाईंनी आपले संपुर्ण जीवनच शेतात घालवलं..अन् शेतातच राबतां-राबतां आपल छोटंस कुटूंब बहरलं..अशा या आजच्या छोट्यातून मोठया सदस्यात बहरलेल्या आनंदमय कुटूंबातील कष्टमय माऊलीच देवाघरी निघून गेली..त्यानंतर मात्र त्याच माऊलीच्या आठवणी शेतातच रहाव्यात यासाठी आजी माऊलीचा नातू हार्दिक निगळ याच्या संकल्पनेतून व सर्वांच्या एक विचाराने अखेर सदर वयोवृध्द आजीबाईंचे निधनानंतर अस्थिविसर्जन हे  त्यांच्याच शेतात करण्यात आले..यावेळी निगळ कुटूंबातील प्रत्येक सदस्यासह उपस्थित ग्रामस्थ यांच्यावतीने शेतबांधावर खड्डे खोदून अस्थिविसर्जनसह विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले..यामुळे आजींच्या आठवणी यापुढे कायमच राहतील..! हाच उद्देश म्हणून निगळ कुटूंब व ग्रामस्थांनी प्रयत्न केला आहे.
    नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यांतील ‘ओझे’ गावचे दिवंगत पोलिस पाटील कारभारी निगळ यांच्या पत्नी गं.भा.अनुसया कारभारी निगळ (वय-८०) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.आज निगळ कुटूंब हे नाशिक-दिंडोरी रोडवरील म्हसरूळ-कलानगरमध्ये रहिवाशी असून ओझे गावचे प्रगतिशिल शेतकरी सुदर्शन कारभारी निगळ यांच्या त्या मातोश्री तर सामाजिक कार्यकर्ते हार्दिक निगळ यांच्या त्या आजी होत. अनुसया निगळ आजींचं सारं कष्टमय आयुष्य ज्या शेतवावरात गेलं त्याच ठिकाणी अस्थिविसर्जन झालं पाहिजे.अशी इच्छा आजींचा नातू हार्दिक निगळ यांनी संपुर्ण निगळ कुटूंब व ओझे ग्रामस्थांजवळ व्यक्त केली..त्यास सर्वानी होकार दिला. त्यानंतर निगळ यांच्या शेतबांधावर निगळ कुटुंब, उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांच्या हस्ते खड्डे खोदून अस्थिविसर्जनासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे स्व.अनुसया आजीं यांना मृत्यू पश्चात त्यांच्याच कर्मभुमीत यापुढेही कायमचं स्थान देऊन खऱ्या अर्थाने निगळ कुटूंब व ओझे ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे..हेही विशेष म्हणावं लागेल..हे विशेष..यावेळी स्व.अनुसया आजींचे मुले-प्रल्हाद निगळ, हरिश निगळ, मुली-सिंधुताई शेजवळ, सुलोचना बोरस्ते, लताबाई खालकर, नातू-विक्रांत निगळ, हार्दिक निगळ, प्रशांत निगळ, कर्मयोगी निगळ, रोहन निगळ, सुहानी निगळ, यश निगळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.——————————————————————-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!