वैनतेय विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची १० वी बोर्डाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
वैनतेय विद्यालयाचा  इयत्ता १० वी बोर्डाचा   निकाल  ९४.६०  टक्के
         नासिक::-निफाड  शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या वैनतेय  विद्यालयाचा गत अनेक वर्षांपासूनचा  इयत्ता १० वी  बोर्डांच्या निकालाची उत्तुंग परंपरा याही वर्षी सुरू ठेवत ९४.६०  टक्के लागला आहे, विद्यालयाने या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी  ९८  टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम क्रमांकाने आली आहे. १० वी परीक्षेसाठी या विद्यालयाचे   ३८९  विद्यार्थी प्रविष्ट झाले  होते यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहेत, यातील विशेष प्राविण्य श्रेणीत   १७७ विद्यार्थी, प्रथम  श्रेणीत ८६  विद्यार्थी , द्वितीय  श्रेणीत  ८३ विद्यार्थी , तृतीय  श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त  गुण मिळाले आहेत 
     या विद्यालयात आलेले  प्रथम ५ गुणवंत  विद्यार्थी   पुढीलप्रमाणे प्रथम-  वैष्णवी मनोज  लाहोटी ( ९८ टक्के) -  ,द्वितीय - अमित ज्ञानेश्वर कापसे - ( ९६.२० टक्के ) ,  तृतीय-  विजया यशवंत  कुंदे- ( ९५.४० टक्के  )   ,चतुर्थ  - श्रावणी किरण सोनवणे - (९५.२० टक्के )  पाचवा - प्रथमेश प्रकाश वाळके - ( ९५ टक्के ).
            यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक  यांचे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त  प्रल्हाद पाटील कराड, संस्थेचे  विश्वस्त आप्पासाहेब उगावकर , वि. दा. व्यवहारे , रतन पाटील वडघुले, प्रभाकर कुयटे, किरण कापसे, राजेंद्र राठी , दिलीप वाघवकर, राजेश सोनी, मधुकर राऊत  ,  वैनतेय विद्यालयाचे  प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य   एस.एम.  सोनवणे,  पर्यवेक्षक  संतोष  गोरवे आदींनी  कौतुक केले
***************************************
भाऊसाहेब हुजबंद यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची इ.१०वी एस.एस.सी. परीक्षा निकालाची यशस्वी परंपरा कायम....*
           नासिक::-विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १० वी मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी एकूण ३१८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. त्यापैकी १४५ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व १० विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९६.८५% लागला. विद्यालयात  प्रथम- दरेकर माधुरी यशवंत (४८० गुण/ ९६.००%),  द्वितीय- शेलार सृष्टी राजेंद्र (४७६ गुण/९५.२०%), तृतीय- चव्हाण आयुष किशोर व जाधव तृणाली रविंद्र (४७२ गुण/९४.४०) या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
            सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी व नारायणे गुरुजी, सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, जगदीश जेऊघाले, काशिनाथ शेवाळे, पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पत्रकार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे., लाईफ वर्कर आर.के.चांदे, वर्गशिक्षक एस.पी.गाडेकर, व्ही.सी.भोसले, ए.टी.वळवी, एन.बी.बोरसे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
**************************************
न्यूज मसाला परीवाराकडून सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक, शिक्षकवृंद, संस्थाचालकांचे अभिनंदन व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा !
                                           संपादक-नरेंद्र पाटील ****************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक