न्यूज मसाला स्पेशल,. आँनलाईन सभा तहकूब एक शोकांतिका !! सविस्तर न्यूज मसाला स्पेशल वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

न्यूज मसाला स्पेशल,
शोकांतिका-आॅनलाईन सभा तहकूब !
        नासिक::-आँनलाईन सभा तहकूब करण्यात आली, या बातमीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी समर्थन केले. समर्थन करणाऱ्यांनाही स्पष्ट व खंबीरपणे भूमिका सादर करता आली नाही.
        कोरोना जागतिक महामारी आहे, हे संकट भयानक रूप धारण करू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने नेहमी सूचित करण्यात येत आहे तरीही कुणी हट्टाला पेटून समाजाचं तसेच स्वत:चे नुकसान करून घेणार असेल तर अशांना काय उपमा देता येईल ? ज्यांचा उदरनिर्वाह आपले अस्तित्व विसरून करीत आहेत, आजच्या परिस्थितीला, उपासमारीच्या संकटाला तोंड देत आहेत, तेथे सभागृहात सभा घ्यावी असा आग्रह करणारे यांना काय उपमा देता येईल ?
        न्यायालयात सुरु असलेल्या सुनावण्या आँनलाईन होत आहेत, एका प्रकरणात आँनलाईन कागदपत्रे सादर करणे शक्य नाही असे राज्यसरकारच्या वतीने न्यायालयाला सांगितले जाते तेथेही निर्णय प्रलंबित ठेवण्यात येतो, देशाचे पंतप्रधान, राज्य सरकारे, तसेच प्रशासकीय पातळीवर सर्वच आँनलाईन सभा घेत आहेत, यावरून तरी आँनलाईन व आॅफलाईन सभेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
         जागतिक महामारीत सर्व घटक घरात आहेत, विकास व जनसामान्यांच्या आरोग्या बाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायलाच हवे, त्यासाठीच जनतेने त्यांना निवडून दिलेले असते पण दुर्दैवाने म्हणावे लागते की "हेच का लोकप्रतिनिधी", जे समाजाच्या कल्याणासाठी घरी बसून आँनलाईन सभेत हजर राहू शकत नाहीत, जिल्हाधिकारी आॅफलाईन सभेला परवानगी देत नाहीत, आणि कुठलाही सारासार विचार न करता आँनलाईन सभेवर बहिष्कार टाकतात, सभा तहकूब करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाते, याचा सर्वसान्यांनी काय अर्थ घ्यावा हा प्रश्र्न उपस्थित होतो, स्वत:च्या बुद्धिमत्तेला गहाण ठेवण्याचा व भाडेतत्त्वावर घेतलेल्या बुद्धिचा वापर व्हावा ही शोकांतिका आहे असेच निदर्शनास येते, अशावेळी स्वत:ला खूप हुशार समजणारे नेतृत्वाची खरी परीक्षा असते, स्वअस्तित्व गमावल्यासारखे वागणे आणि आॅफलाईन सभेसाठी करण्यात येणा-या युक्तिवादावर दिले जाणारे तकलादू स्पष्टीकरण, आॅफलाईन सभेचा अट्टाहास काय दर्शवितो हे न समण्याइतकी जनता खुळी नाही, जे काही सभागृहात मांडायचे आहे ते आँनलाईन सभेतही मांडता येऊ शकतेच ना ? जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका पातळीवर जाऊन परीस्थिती हाताळत आहेत, तेथील सभेला स्थानिक जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना निमंत्रित केले जाते, या सभांचा परीणाम व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी घेण्यात येणारी सभा यांचा जनतेच्या सेवेसाठी होणारा परिणाम याचा जराही विचार करू नये ?
        सभा तहकूब हा हास्यास्पद प्रकार असल्याचेही खाजगीत अनेक जण बोलून दाखवत आहेत, आॅफलाईन सभेला सर्वांनाच उपस्थित राहणे जेव्हा शक्य होत नाही, कोरम पूर्ण होत नाही किंवा विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी जेव्हा वेळ मागितली जाते तेव्हा कोणत्याही निर्णयाविना तसेच राष्ट्रीय आपत्ती, संस्थेवर ओढवलेले संकटात सभा तहकूब होते मात्र असे कोणतेही कारण नसताना घरात बसून आॅनलाईन सभेवर बहिष्कार टाकून सभा तहकूबची नामुष्की ओढवून घेणे याची कारणमीमांसा काय सांगेल ? कुण्या उसणवारीच्या मेंदूच्या अतिरेकी संकल्पनेला उचलून धरणे, इतकेच !! आणि ही उसणवारी एक दिवस डोक्यावर बसली नाही तर नवलच ! उसणवारी फेडता फेडता नाकीनऊ येते तेव्हा आपल्या अस्तित्वाला ओहोटी लागते ! अनेक कार्यसम्राट आलेत अन् लुप्त झालेले आपण बघतच आहोत, अजूनही वेळ गेलेली नाही असे या तहकूब सभेबद्दल बोलले जात आहे, म्हणून तहकूब सभा एक शोकांतिका समजावी काय ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक