एकलव्याची वृत्ती , जिद्दीतून कलाकृती ! काश्चुम डिझायनर गंधाली धोंगडे यांचा कोरोना काळातील कलेचा प्रवास !! लेख सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!
NEWS MASALA SERVICES, NASHIK, 7387333801 **************************************** एकलव्याची वृत्ती , जिद्दीतून कलाकृती ! चित्रकलेचे शास्त्रशुद्ध उच्चशिक्षण सगळ्यांनाच घेता येत नाही.असे असले तरीही अनेकजण आपल्यातील अंगभूत सुप्त कलागुणांचा विकास एकलव्याच्या वृत्तीने करतात. रूढार्थाने गुरु लाभलेले नसतानाही, सातत्याने केवळ निरीक्षण, सराव करुन पारंगत होतात व यशाचे शिखर गाठतात. विदर्भातील अकोल्याच्या गंधाली धोंगडे यांनी अशीच वाटचाल करीत जिद्दीने कलाक्षेत्रात ठसा उमटवला आहे. व्यवसायाने त्या कॉश्च्युम डिझाईनर आहेत. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास करुन त्यात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना त्या गुरुस्थानी मानतात. त्यांची चित्रे बघून प्रेरणा मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात. कोरोनाच्या आकस्मिक संकटाने सारे जग स्तब्ध झाले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्वांना अचानक लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घरात अडकून पडले. गंधाली यांनी या परिस्थितीत न डगमगता, ती इष्टाप