पोस्ट्स

१ मे १९२३ ला पहिल्या कामगार दिनाचे आयोजन सिंगरवेल्लू चेत्तीअर यांनी मद्रास इथे केले, लालबावटा ही निशाणी होती. लेखक अंकुश शिंगाडे यांचा सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कामगार दिन की  राजकारण          आज १ मे जागतिक कामगार दिन. देशात नाही तर जगात मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. महाराष्ट्रात तर याचा संबंध महाराष्ट्र दिनाशी जोडून १मे १९६० ला महाराष्ट्र दिवशी राज्याची निर्मीती करण्यात आली. नव्हे तर कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचं नवं नाव देवून नवीन राजकारण निर्माण करण्यात आलं.           १मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो. त्याही पाठीमागे कारणं आहे. जागतिक दर्जाचे इग्लंड, डच, पोर्तुगीज या देशांनी उद्योगाचे महत्व लक्षात घेवून आपआपल्या देशात उद्योग उभारणी केली. याचं मुळ कारण तेथील ज्ञानाचा प्रसार व संशोधन. अठराव्या शतकात या युरोपीयन लोकांनी नवनवे शोध लावले. त्या शोधाच्या आधारानं वस्तूंचं उत्पादन जास्त झालं. शिवाय जागतिक बाजारपेठेत ह्या वस्तू विक्रमी स्वरुपात झाल्यानं तो पैसा गुंतविण्यासाठी त्यांना वेगळ्या बाजारपेठा शोधणे भाग होते. त्यातच या देशांनी आपला पैसा उद्योगाच्या रुपात पैसा दुस-या देशात गुंतवला. जे अविकसित देश होते. यात कारण होतं, पैसा जास्तीत जास्त कमावणे व उद्योगाचा प्रसार करणे. तसेच आपल्या देशाचा

मडगांव ते नागपूर व्हाया नासिक रेल्वे सुरू करण्याची गरज का ? किती विद्यापीठे, धार्मिक स्थळे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत गाडगेबाबा स्मारक यांसोबत कोकण-उत्तर महाराष्ट्र-विदर्भ या विभागातील सांस्कृतिक, पर्यटन, औद्योगिक विकास, व्यापार देवाणघेवाण असे या रेल्वेने काय जोडले जाणार !! सविस्तर प्रसतावाच्या बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801

इमेज
रत्नागिरी (न्यूज मसाला सर्विसेस)::- महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी  हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूंचे  स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा मंदिर, धुळे येथील देवपुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे. तसेच कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरा

जनकल्याण समितीतर्फे कोविड काळात रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन, घरपोच आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर्स, औषधे, टीफीन अशा विविध प्रकारच्या मदतीसाठी ३०० स्वयंसेवकांची फळी कार्यरत !! न्यूज मसाला सर्विसेस,. 7387333801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
  नाशिक ( प्रतिनिधी) - सध्याच्या परिस्थितीत रक्ततूटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात नुकतेच कोविडचे प्रोटोकाॕल पाळून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यामध्ये ३८ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच  " प्लाझ्मा डोनेशन" हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णांसाठी काही प्रमाणात जीवनदायी ठरु लागले आहे.त्यासाठी प्रबोधन, संकलन उपक्रम राबविण्यात येत आहे.    जनकल्याण संकूल उत्तमनगर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून १५ 'आॕक्सिजन काँन्स्न्ट्रेटर्स' विकत घेतले आहेत.  ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपाझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सुरु केले आहे. नजिकच्या काळात आजून ५० आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर जनकल्याण संकूलमधे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याची गरज असलेल्यांनी अंकूश बरशीले ९८९००६०७६२ यांच्याशी संपर्क करावा. शौनक गायधनी आणि अभिषेक पिंगळे या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची एक टीम 'जनकल्याण समिती - नाशिक' या नावाने व्हाट्सएप समूहाद्वारे संघटित केली आहे. त्यांच्या अथक उ

कोरोना रुग्णांसाठी ५० बेडस् चे कोविड सेंटर मध्ये मोफत आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे विशेष कार्यक्रम ! जनकल्याण समितीतर्फे विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष सुरू !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जनकल्याण समितीतर्फे सेवाकार्य  विनामूल्य विशेष विलगीकरण कक्ष   नाशिक ( प्रतिनिधी )- रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  हाॅटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे 'कोवीड केअर सेंटर' (विलगीकरण कक्ष) सुरू झाले आहे.  रविवारी ( दि.२५)  वर्धमान जयंतीच्या मूहूर्तावर  सुरू करण्यात आले. ही विनामूल्य सेवा गरजू रुग्णांना देण्यात येईल.     या 'कोविड सेंटरमध्ये'  कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व ज्यांना होम आयसोलेशन मध्ये रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी 'कोविड सेंटर' वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल. येथे जरूरीनुसार साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाणार आहे.रुग्ण कोविड सेंटरमध्ये असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी यासाठीचे  विशेष कार्यक्रम यांचे दिवसभराचे नियोजन  येथील डॉक्टर्स आणि

सिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज तर्फे आज लाईव वेबिनारचे आयोजन ! आयोजकांतर्फे व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
सिस्टर शिवानी करोनाकाळात सकारात्मक विचारांसाठी मार्गदर्शन करणार ब्रह्माकुमारीज  तर्फे  आज लाईव वेबिनारचे आयोजन       मानव समाजाला उच्च सकारात्मक विचारांची दिशा देणा·या सुप्रसिद्ध समुपदेशक व प्रेरक वक्त्या सिस्टर बीके शिवानी यांचे `अपनी मुश्किलोसे बडे बनो` या विषयावर प्रेरक व्याख्यान आज २५ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजित केले आहे.         करोना काळात सर्वत्र भय, दुख: आणि नैराश्येचे वातावरण आहे. मानवी समाजासमोर आलेल्या या मोठ्या संकटास सामोरे जातांना वैद्यकिय उपचाराबरोबर उच्च सकारात्मकतेचीही आवश्यकता असल्याचे जाणूव लागले आहे. नव्हे दृढ मनोबल आणि सकारात्मक विचार हे करोनापासून मुक्तीचे एक मोठे औषध आहे.  सिस्टर शिवानी यांनी जगभरातील व्यक्तिंना उच्च सकारात्मकतेचा संदेश देऊन त्यांचे सुदृढ मनोबल तयार केलेले आहे. त्यायोगे विचारांनी जीवनाची दिशा आणि दशा बदलेले लाखो व्यक्ति त्याची साक्ष देतात.          ब्रह्माकुमारीज् मीडिया सर्विस सेंटरतर्फे त्यांच्या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन आज रविवार  दि. २५ रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले असून युट्यूब व झुमच्या माध्यमातून लाईव संवाद सिस्टर शिवानी साधणार आहे.

हर्षद थविल याने बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला ! 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
' सामूहिक वृत्ती 'ची वारली कलाकृती !     आदिवासी वारली चित्रशैली ही जरी 'स्व-तंत्र' असली ; तरी आपल्या प्रकटीकरणात एक कलावस्तू म्हणून ती 'सामूहिक स्वयं-शिस्त' देखिल कटाक्षाने पाळत असल्याचे जाणवते.वारली कला निसर्गाविषयी स्नेह, पर्यावरणाबाबत प्रेम आणि दैनंदिन जीवनात आत्मसन्मान बाळगायला शिकवते. वारली कलाकार चित्रांचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. अज्ञात दैवी शक्तीने हे रेखाटन आपल्याकडून घडवून आणले, अशी त्यांची श्रद्धा असते. त्यामुळेच 'मी- माझं' या धारणेच्या पलिकडची एक  ' समूहवाचक ' अशी कलाकृती निर्माण होते. म्हणून वारली चित्रशैली ही सामूहिक वृत्तीची निदर्शक आहे, असेच म्हणावे लागते.नुकताच वसुंधरा दिन झाला, त्यानिमित्ताने ...     ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आदिवासी वारली चित्रकलेला लाभली आहे. गडद पार्श्वभूमीवर फक्त पांढरा रंग, मूलाकारांचा वापर, दैनंदिन जीवनातील प्रसंग, ठराविक चित्रविषय अशा मर्यादा या कलेला आहेत. त्या कोणी लादलेल्या नसल्या तरी स्वेच्छेने स्वीकारलेल्या या मर्यादांवर मात करून वारली चित्रवैभव निर्माण होतं. चित्र काय व कसं काढायचं हे

निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार ! वारली चित्रशैलीतील रामकथा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार !    चित्र, संगीत आणि नृत्य या कला आदिवासी लोकजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्या दैनंदिन वापराच्या साध्या साध्या वस्तूंनाही कलेचा परिसस्पर्श झालेला दिसतो. आवश्यक तितकंच तांत्रिक कौशल्य वापरून निसर्गपुत्रांनी केलेला सुगम कलाविष्कार हा आदिवासी कलेचा प्राण आहे. वारली चित्रे सहजपणे संवाद साधतात म्हणून ती सुगम आहेत. वारल्यांना त्यांच्या कलानिर्मितीची प्रेरणा निसर्गाकडून मिळते. त्यांचे माध्यम निसर्ग व आविष्कारही निसर्गच आहे. निसर्गाकडून घेऊन निसर्गालाच अर्पण करणे हे वारली जमातीचे जीवनसूत्र आहे. परिसराशी सुसंवाद साधणारी निर्मिती हे वैशिष्ट्य त्यांच्या कलेत ठळकपणे जाणवते.     वारली ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. त्यांची एक वेगळी संस्कृती असून तिच्या परिघातच ते आनंदाने जगतात. त्यांचे जीवन खडतर, कष्टमय असले तरीही निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची कला फुलते. भारतीय नागरी सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीला आदिवासी कलांचं अधिष्ठान आहे. वारली जमात दुर्गम पाड्यांवर राहून सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करते. ११०० वर्ष