पोस्ट्स

नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

इमेज
नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार ! लातूर (प्रतिनिधी)::- डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३१ जुलै रोजी वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.       कथासंग्रह, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र व आंबेडकरी साहित्य अशा सहा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.       प्रथम १५००/- द्वितीय १०००/- व तृतीय ७५०/- रुपये, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. एकुण १८ पुरस्कारांमध्ये बालसाहित्य गटांत नासिकच्या प्रा. सौ. सुमती पवार व कविता गटातून कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.         लातूर येथील बस स्थानकाशेजारील डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११:३० वा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. अॅड. श

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख

इमेज
२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख           पुणे दि. ४ जुलै :मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य प्रांगणात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज केली. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते..          पुणे जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली तालुका पत्रकार संघाची संयुक्त बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषदेने अधिवेशन घेण्याची तयारी दर्शविली. त्याला मराठी पत्रकार परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे २० आणि २१ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन परिषदेच्या परंपरेला साजेशे भव्य दिव्य स्वरूपात साजरे होत आहे. खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते, अमोल को

महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !

इमेज
महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !         नाशिक दि.०४ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आय टी सेना  ( Information Technology ) कर्मचारी संघाची पुणे येथे झालेल्या बैठकीत नाशिकचे अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे घोषणा संघाचे  प्रदेशाध्यक्ष सचिन सरवदे यांनी केली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. निमसे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.              माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोत्तरीपरी प्रयत्न करू असे निमसे यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगितले, यावेळी महाराष्ट्र आय टी सेना  (Information Technology) कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन भारत सरवदे ,  उपाध्यक्ष रविकिरण  घटकर , सचिव संदीप चौबे, संघटक विक्रम सिंह राजेंद्र सिंह राजे भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते ८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

इमेज
दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते ८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !             नासिक::- ॐ साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाईंड अॅंण्ड डिसेबल संस्थेच्या वतीने नासिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये  दिव्यांगासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जागतिक पातळीवरील हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त अंध व्यक्तिंच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नासिक मनपाचे माजी सभापती गणेश गिते तसेच माणुसकी ग्रुप विंचूर चे किशोर दरेकर, प्रकाश ठोंबरे, हर्षल काळे, राहुल शिळमकर, शेखर लोळगे, एम एस एल ड्राय लाईम सिस्टिमचे व्यवस्थापक हेमंत राख, युनियन अध्यक्ष उत्तम खांडबहाले, हडपे, बोरसे, फड, जयस्वाल आदींसह सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस, न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील उपस्थित होते.          गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई नाका येथील एक भूखंड आपल्या कारकीर्दीत दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिला आहे, पुढील काळात नासिक मनपात सत्तेत असो वा नसो मात्र आणखी एक भूखंड उपलब्ध करून दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश

पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !

इमेज
पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न ! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी)  शुक्रवार ( दि.१) सौ. अंजली पापडीवाल यांनी आपल्या अतूट श्रद्धेचा, निस्सीम भक्तीचा प्रत्यय कृतीद्वारे दिला. मुलगा जीनेश व सून सुरभी यांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने संपूर्ण पंचामृत अभिषेक केला. सलग १७ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सवात काल शुक्रवारी ( दि.१) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीचे महामंत्री संजय पापडीवाल यांच्या सौ. अंजली धर्मपत्नी आहेत. या दाम्पत्याने आपल्या वडिलांचा वारसा जपला आहे.        शुक्रवार ( दि.१) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक करून धन्य झाल्याची भावना अंजली पापडीवा

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

इमेज
कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड कृषि दिन कार्यक्रम, कृषि विभाग, जिल्हा परिषद नाशिक       नासिक::- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त १ जुलै हा दिवस दरवर्षी प्रमाणे कृषिदिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानुसार दिनांक १ जुलै २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, कृषि विभाग आत्मा, कृषि विभाग जिल्हा परिषद नाशिक तसेच पंचायत समिती नाशिक यांचा संयुक्त कार्यक्रम कै. रावसाहेब थोरात सभागृह मुख्य इमारत जिल्हा परिषद नाशिक येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी अर्जुन गुंठे, विभागीय कृषी सहसंचालक विवेक सोनवणे, विभागीय कृषी अधिक्षक सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजे

माथी मुकुट, हाती कलश !मुखातून शत शत नमन !!महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...!

इमेज
माथी मुकुट, हाती कलश ! मुखातून शत शत नमन !! महामस्तकाभिषेक सोहळा   १० जुलै पर्यंत वाढवला...! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी) गुरुवारी (दि.३०) प्रत्येक अभिषेककर्त्याच्या माथ्यावर मुकुट, हाती कलश आणि मुखामध्ये शत शत नमनचा जयघोष असे प्रसन्नता वाढवणारे चित्र दिसत होते. सलग १६ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक  महोत्सवात गुरुवारी (दि.३०) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. यावेळी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींनी असंख्य भाविकांच्या मागणीनुसार दि. १० जुलैपर्यंत सोहळा सुरू राहील अशी भाविकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात घोषणा केली.          गुरुवारी (दि.३०) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान मुंबईचे सुनील गंगवाल, मेरठ येथून आलेले सुनील सराफ व जयपूरचे मनोज जैन य