दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते ८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते

८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
            नासिक::- ॐ साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाईंड अॅंण्ड डिसेबल संस्थेच्या वतीने नासिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये  दिव्यांगासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जागतिक पातळीवरील हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त अंध व्यक्तिंच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नासिक मनपाचे माजी सभापती गणेश गिते


तसेच माणुसकी ग्रुप विंचूर चे किशोर दरेकर, प्रकाश ठोंबरे, हर्षल काळे, राहुल शिळमकर, शेखर लोळगे, एम एस एल ड्राय लाईम सिस्टिमचे व्यवस्थापक हेमंत राख, युनियन अध्यक्ष उत्तम खांडबहाले, हडपे, बोरसे, फड, जयस्वाल आदींसह सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस, न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील उपस्थित होते.

         गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई नाका येथील एक भूखंड आपल्या कारकीर्दीत दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिला आहे, पुढील काळात नासिक मनपात सत्तेत असो वा नसो मात्र आणखी एक भूखंड उपलब्ध करून दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले, दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले.
        हेमंत राख आपल्या भावना व्यक्त करताना, कंपनीच्या माध्यमातून आजपर्यंत सामाजिक उपक्रम राबवित आलो व यापुढेही या सामाजिक कार्यासाठी संस्थेस मदत करीत राहू.
        सदर कार्यक्रमात ८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

    यावेळी कुमार चावरे, विद्या जगताप, निमिता शेजवळ, उपस्थित होते. संस्थेचा परिचय अध्यक्ष विकास शेजवळ यांनी करून दिला. संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले, 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट चे नितिन निकम यांच्या सह कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले, सूत्रसंचालन महासचिव रामदास जगताप यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।