कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन,
शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

कृषि दिन कार्यक्रम, कृषि विभाग, जिल्हा परिषद नाशिक
      नासिक::- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त १ जुलै हा दिवस दरवर्षी प्रमाणे कृषिदिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानुसार दिनांक १ जुलै २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, कृषि विभाग आत्मा, कृषि विभाग जिल्हा परिषद नाशिक तसेच पंचायत समिती नाशिक यांचा संयुक्त कार्यक्रम कै. रावसाहेब थोरात सभागृह मुख्य इमारत जिल्हा परिषद नाशिक येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी अर्जुन गुंठे, विभागीय कृषी सहसंचालक विवेक सोनवणे, विभागीय कृषी अधिक्षक सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे प्रिती हिराळकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहीले.
        कार्यक्रमाच्या सुरवातीस कृषि विभागाच्या वतीने किटकनाशके फवारताना व हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या चित्र रथास उपस्थित पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवुन मोहिमेचा शुभारंभ केला.


       सदर कार्यक्रमामध्ये आत्मा अंतर्गत निवडण्यात आलेले १९ आदर्श शेतकरी व ०२ उत्कृष्ट शेतकरी गट २०२१-२२ यांना पुरस्कृत करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये इफको खत कंपनीचे प्रतिनिधी निमिश पवार यांनी पिकासाठी नॅनो युरियाचा वापर करण्याबाबत, तंत्र अधिकारी उपविभाग कळवण सीताराम चौधरी यांनी खरीप पिक विमा तसेच, तंत्र अधिकारी विश्वास बर्वे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या बाबत उपस्थित शेतक-यांना माहिती दिली.


         मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या पाणंद रस्ता योजना तसेच बांधावर फळबाग/ वृक्ष लागवड योजना करीता महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन केले, तसेच कृषि पर्यटनाच्या माध्यमातुन शेती उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याची गरज व्यक्त केली.


       अध्यक्षीय भाषणात बोलताना  जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घेण्याबाबत सुचना केली, तसेच जिल्हयात पावसाचे आगमन झाले असुन शेतक-यांना गुणवत्ता पुर्ण कृषि निविष्ठा मिळणेकरीता कृषि विभागाने सतर्क राहुन काम करावे. तसेच बोगस व भेसळयुक्त निविष्ठा विक्री करणा-यांवर कठोर कारवाई करावी असे सांगीतले. कार्यक्रमाचा समारोप रमेश शिंदे, कृषि विकास अधिकारी जि.प. नाशिक यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अभिजित जमधडे, मोहिम अधिकारी जि.प.नाशिक यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !