पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत !

इमेज
"माझा अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत बायको किंवा मेव्हणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले खाजगी सचिव अडचणीत आणतात - "दिलखुलास" नितीन गडकरी (२६ मार्च २०२२) ,,,,,,, सावधान, नाशिकमधील किटल्या गरम होऊ लागल्या आहेत ! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नावाजलेले राजकीय पदाधिकारी यांना काहीही सोयरसुतक नसल्यासारखे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र निवडणुकांपूर्वी सर्वात मोठा सण दिपवाळीचा जवळच आलेला असताना विविध माध्यमांतून प्रसिद्धी करण्याची संधी दवडली जात आहे.  यांत सर्वच राजकारण्यांची मनोवृत्ती अशी असेलच यात दुमत असू शकते, काही याबाबत खूप जागरूकतेने कार्य करणारेही आहेत. सर्वच नव्हे पण त्यांचे चेले चपाटे ही काही कमी नाहीत, या "किटल्या" कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी आस्थापना, मोठमोठ्या खाजगी आस्थापना यांच्या कार्यालयात "खेट्या" का मारतात हा आता संशोधनाचा विषय उरलेला नाही, जे चालले आहे त्यातून सारं काही जनताजनार्धन उघड्या डोळ्यांनी पहात आहे. या "किटल्यांचा" प्रशास...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला !

इमेज
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबरला ! नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन आधुनिक इमारतीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली. या परिषदेस महाराष्ट्र व गोवा वकील परिषद सदस्य ॲड. जयंत जायभावे, नाशिक जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, सहसचिव ॲड.संजय गिते, ॲड.सोनाल गायकर, खजिनदार ॲड.कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.  नाशिक जिल्हा न्यायालयाची स्थापना सन १८८५ मध्ये झाली. जुन्या दगडी इमारतीनंतर सन २००५ मध्ये न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली होती. मात्र खटले, वकील व न्यायाधीशांची संख्या वाढल्याने न्यायालयाच्या विस्ताराची आवश्यकता भासली. वकील संघाच्या पाठपुराव्य...

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

इमेज
लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल नाशिक::- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात १३ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत  जिल्ह्यातून एकूण १३ हजार २०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १२३ कोटी ८८ लाख  ८६ हजार ९६५ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले असून, एक चाळीस वर्षांपूर्वीचा दावा निकाली निघाला आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड   मोटार अपघात प्रकरणात २०१९ साली राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक मध्ये झालेल्या अपघात बसमधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये ९२ लाख इतकी नुक...

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !   नाशिक (साक्री-धुळे)::- तालुका कृषी अधिकारी मनसीराम तुळशीराम चौरे, तालुका कृषी कार्यालय साक्री व कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान रफिक शेख यांना ७०००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांच्या नावे मौजे पन्हाळी पाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जमा झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दोन्ही आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १००००/-  रुपयांची मागणी केली केल्याची तक्रार आज १ सप्टेंबर रोजी दूरध्वनी द्वारे दिली होती. सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी साक्री येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रार नोंदवून घेऊन सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तक्रार यांच्याकडे १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आलोसे एक व दोन यांनी तक्रारदार यांच्या...