तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

  नाशिक (साक्री-धुळे)::- तालुका कृषी अधिकारी मनसीराम तुळशीराम चौरे, तालुका कृषी कार्यालय साक्री व कंत्राटी डाटा ऑपरेटर रिजवान रफिक शेख यांना ७०००/- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. 
         तक्रारदार यांच्या नावे मौजे पन्हाळी पाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे शेतजमीन असून सदर शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जमा झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात दोन्ही आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १००००/-  रुपयांची मागणी केली केल्याची तक्रार आज १ सप्टेंबर रोजी दूरध्वनी द्वारे दिली होती. सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी साक्री येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रार नोंदवून घेऊन सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तक्रार यांच्याकडे १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान आलोसे एक व दोन यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी ७०००/- रुपयांची रक्कम तक्रार यांचेकडून स्वतः स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।