३५ वर्षांनंतर १५० पोलिस अधिकारी जेव्हा एकमेकांना भेटतात ! खालील लिंकवर क्लिक करून कुठे भेटलेत ? वाचा सविस्तर
महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत भेटले ३५ वर्षांपूर्वीचे सहकारी नाशिक ( प्रतिनिधी ) - १९८७ बॅचचे पोलिस अधिकारी ३५ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. यावेळी आठवणी जागवतानाच सोनेरी क्षणांना उजाळा देण्यात आला. त्यासाठी निवृत्त अधिकारी विनोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगले नियोजन केले. त्यामुळे १५० जणांना महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात सुमारे १० महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सारेजण या सोहळ्यात हरखून गेले. सेवानिवृत्त झालेल्या किंवा त्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्वांनाच आपण अजूनही तरुण असल्याचा आनंद मिळाला. १५ जून १९८७ ते ३१ मे १९८८ या वर्षभरात नाशिकच्या तत्कालीन पीटीसीमध्ये महाराष्ट्रातील ३०० व गोव्यातील २८ युवकांनी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यात ३० युवतींचीही त्यावर्षी प्रथमच एमपीएससीद्वारा निवड झाली होती. त्या साऱ्यांना एकत्र आणून नाशिकला दोन दिवसांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. विनोद सावंत यांच्या मूळ संकल्पनेला अनेकांनी साथ दिली. दरम्यानच्या काळात बहुतेकजण सेवानिवृत्त झाले. ४६ जण दिवंगत झाले. मात्र महिला अधिकाऱ्यांसह १५० जणां