शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ ! नाशिक - (प्रतिनिधी)::- क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे आयोजित शेल्टर २०२४ हे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब असून नोकरीनिमित्त अनेक शहरात राहण्याचा योग येणाऱ्या आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची भुरळ पडते. त्यामुळेच नाशिकमध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सुर नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शविला. २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर २०२४ चे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्शय शाह, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन का...