पोस्ट्स

मगनलाल बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान !

इमेज
मगनलाल बागमार  'दृष्टिकोन' फुलोरा साहित्य रत्नाने सन्मानित ! नाशिक(प्रतिनिधी)::- नाशिकचे जेष्ठ कवी, साहित्यिक, नाशिक मर्चंट बँकेचे माजी सरव्यवस्थापक मगनलाल बागमार यांच्या दृष्टिकोन या चारोळी काव्य संग्रहाला फुलोरा साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.          संगमनेर येथील फुलोरा कलेचे माहेरघर या संस्थेच्या वतीने, मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सत्यशीव हॉल, संगमनेर येथे १२ वे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी नाशिकचे  साहित्यीक  मगनलाल बागमार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.            हास्य पंचमीकार  बंडा जोशी, साहित्यीक भगवान जोशी आणि प्राचार्य सौ. आशालता काळे यांच्या हस्ते 'दृष्टीकोन’ या चारोळी संग्रहासाठी बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी आयोजित काव्य संमेलनात त्यांनी त्यांची स्वरचित कविता ‘लेक’ सादर केली. रसीकांनी त्यांच्या कवितेला भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. रंजना बोरा आणि समूहाचे अध्यक्ष सचिन सातपुते यांनी केले. त्यांना मिळलेल्या पुर

"महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण ! खास. अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, पत्रकार अनिल थत्ते,चारूशिला देशमुख, कामगार नेते अभिजित राणे,या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१ "महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ' आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. माजी केंद्रीय मंत्री खासदार कामगार नेते अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते, राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका चारूशिला देशमुख, कामगार नेते संपादक अभिजित राणे, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून खास निमंत्रितांचं कवी संमेलन आयोजित करण्यात अाले होते. मकरंद वांगणेकर, श्रद्धा पौडवाल, रिया पवार,  विलास खानोलकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी सहज सुंदर कविता सादर करून मराठी भाषेप्रती आपली सेवा दिली आणि उपस्थितांची दाद मिळवली.               कार्यक्रमाच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिन बेंडभर यांचा विशेष सन्मान करुन गौरविण्यात आले !

इमेज
"मराठी भाषा गौरव दिनानिमित्त युवा लेखक सचिन बेंडभर यांचा सन्मान ! पुणे,२८,प्रतिनिधी::- पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने साई गार्डन मंगल कार्यालय येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष, महिबूब सय्यद यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्ष मनसेचे अध्यक्ष रवी लेंडे, विधी कक्ष मनसेचे तालुका अध्यक्ष ॲड. आदित्य मैड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.               पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचे मराठी साहित्यात विपूल लेखन आहे. आजपर्यंत त्यांची ४८ पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे.           बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घ

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री'  ४ मार्चपासून होतोय दाखल

इमेज
प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री'  ४ मार्चपासून चित्रपटगृहात दाखल  नाशिक (प्रतिनिधी )  नवोदित दिग्दर्शक योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांची लव्हेबल केमिस्ट्री 'वन फोर थ्री उद्या' ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित हा मराठी चित्रपट रोमँटिक चित्रपटांच्या गर्दीमध्ये पुढे सरसावत आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा हा प्रेममय चित्रपट व्यक्त करेल. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. पत्रकार परिषदेत अशी माहिती देण्यात आली यावेळी कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.              दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचे जबरदस्त खलनायकी असं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे यांची देखील भूमिका  आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द

११ मार्चला रेन्बो प्राईड ऑफ इंडिया सोहळ्याचे आयोजन !!

इमेज
एलजीबीटींसाठी होणार "रेन्बो प्राईड ऑफ इंडिया फॅशन शो" "हे फाऊंडेशनचा ११ मार्चला सोहळा" मुंबई (गुरुदत्त वाकदेकर ) : मुंबईसह देशभरातील एलजीबीटी समूहासाठी "हे फाऊंडेशनच्या वतीने डॉ. संगीता पाटील" यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे "रेन्बो प्राईड ऑफ इंडिया" ह्या भव्य फॅशन शोचे आयोजन ११ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. यात भारतभरातील स्पर्धक सहभागी होणार असून आपली कला सादर करतील. यावेळी मिस्टर आणि मिसेस रेन्बो प्राईड यांची घोषणा होईल. सामाजिक एकता तसेच समाजात मुख्य प्रवाहात वावरताना कुठल्याही प्रकारे भेदभाव होऊ नये, या सामाजिक हेतूने तसेच  जनजागृतीच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क – ८१०४९८२६२६, www.rainbowpride.in, www.heyfoundation.org

शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न !

इमेज
शब्दगंध च्या पाथर्डी शाखेतर्फे  साहित्यिकांचा सन्मान सोहळा संपन्न !       पाथर्डी (प्रतिनिधी)::- मराठी साहित्य हे आपल्या माय बोलीतील साहित्य असते, ते अनुभवाने समृद्ध बनलेलं असतं आणि त्याला प्रवाहित करण्यासाठी साहित्यिकांची गरज असते, मराठी आपली माय बोली तसेच  राजभाषा असल्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी.ढाकणे यांनी केले.    शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी शाखेच्या वतीने श्री तिलोक जैन माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते, मराठी साहित्यात भर घालणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.           याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, मकरंद घोडके, पर्यवेक्षक विजयकुमार घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी दिलीप सरसे यांचा 'दिंडी 'आणि 'कट्टा ' या कादंबरी बद्दल, श्रीमती विद्या भडके यांचा 'उठे तुफान काळजात' या काव्यसंग्रहाबाबत, प्रा.डॉ.सुभाष शेकडे यांच

विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा ! - प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक

इमेज
विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा !          - प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक ठाणे-कल्याण ( प्रतिनिधी आशा रणखांबे )::- 'महाराष्ट्रभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाड़कर तथा कुसुमाग्रजांचा वारसा विद्यार्थ्यांनी समर्थपणे पुढे चालवावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी - बेडेकर कला - वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी काढ़ले.             मराठी भाषा आणि साहित्य विभागातर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आभासी मंचाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.             डॉ. सुचित्रा नाईक पुढे म्हणाल्या, "जीवनाचा प्रवास यशस्वी करणाऱ्या लेखक - कवींची अनेक पुस्तके विद्यार्थ्यांनी घडत्या वयात वाचायला हवीत. पुस्तके जीवनाला दिशा देतात. ही योग्य दिशा महाविद्यालयीन जीवनात मिळणे गरजेचे असते. कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज विद्यार्थ्यांनी कवितांतून ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेव