विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा ! - प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक


विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा !

         - प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक

ठाणे-कल्याण ( प्रतिनिधी आशा रणखांबे )::- 'महाराष्ट्रभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाड़कर तथा कुसुमाग्रजांचा वारसा विद्यार्थ्यांनी समर्थपणे पुढे चालवावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे उद्गार विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी - बेडेकर कला - वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी काढ़ले.
            मराठी भाषा आणि साहित्य विभागातर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आभासी मंचाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
            डॉ. सुचित्रा नाईक पुढे म्हणाल्या, "जीवनाचा प्रवास यशस्वी करणाऱ्या लेखक - कवींची अनेक पुस्तके विद्यार्थ्यांनी घडत्या वयात वाचायला हवीत. पुस्तके जीवनाला दिशा देतात. ही योग्य दिशा महाविद्यालयीन जीवनात मिळणे गरजेचे असते. कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज विद्यार्थ्यांनी कवितांतून ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. "
        यावेळी उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे ,प्रा. संतोष राणे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
          काव्यपुष्पांजली कार्यक्रमात हिंदी विभागप्रमुख डॉ.अनिल ढवळे यांनी 'गाभारा' आणि प्रा.राजश्री माने यांनी 'दूर मनोऱ्यात' कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
राधिका आपटे, साक्षी राऊत, ज्योत्स्ना धुरी, मृदूला जोशी, अशोक कांबळे, श्रावणी बर्वे, मानसी हिंदळेकर, प्रांजली सकट, आर्या कुलकर्णी, श्रद्धा कांबळे, साक्षी गावडे, टिना चेंदवणकर, प्रार्थना केंगार या विद्यार्थ्यांनी कविता सादर करून 'मराठी राजभाषा गौरव दिनाला' बहार आणली. ऋता वाळूंजकर आणि साक्षी देवधर यांनी 'मराठी भाषा आणि आपण ' हा लेख सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपेश महाडीक यांनी केले. प्रा. राजश्री माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. या काव्यपुष्पांजली सोहळ्याला अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित