महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सचिन बेंडभर यांचा विशेष सन्मान करुन गौरविण्यात आले !



"मराठी भाषा गौरव दिनानिमित्त युवा लेखक सचिन बेंडभर यांचा सन्मान !

पुणे,२८,प्रतिनिधी::- पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने साई गार्डन मंगल कार्यालय येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष, महिबूब सय्यद यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्ष मनसेचे अध्यक्ष रवी लेंडे, विधी कक्ष मनसेचे तालुका अध्यक्ष ॲड. आदित्य मैड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
              पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचे मराठी साहित्यात विपूल लेखन आहे. आजपर्यंत त्यांची ४८ पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे.
          बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या "कळो निसर्ग  मानवा" या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात  केली आहे.
             स्वतः लेखक व कवी असून वयापेक्षा विपुल साहित्य संपदा स्वतःच्या नावावर असलेल्या सचिन बेंडभर यांच्या कथा, कविता, लेख, कादंबरी विविध लोकप्रिय वृत्तपत्रातून, मासिकातून तसेच न्यूज मसालाच्या "लोकराजा" सारख्या दर्जेदार दिवाळी अंकातून सातत्याने प्रकाशित होत आहेत.
        "येते जगाया उभारी" हा प्रकाशित झालेला त्यांचा काव्यसंग्रह राज्यभर गाजत आहे. या काव्यसंग्रहास आजपर्यंत आठ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
          स्वतः लिहीत असताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता, शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके संपादित करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत. त्यांची येते जगाया उभारी ही कविता, मंथन प्रकाशनाने शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत ज्ञानवंतच्या आठव्या अंकात घेतली आहे. अत्यंत कमी वयामध्ये सचिन यांनी बालसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, अनुवाद या वेगवेगळ्या विभागात लेखन करुन अल्पावधीत साहित्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.
              सचिन यांच्या  कथांना  जसा विनोदी बाज असतो, तसा कवितांना शेती-मातीचा गंध असतो. रानवारा, गाणं शिवाराचं, येते जगाया उभारी या तीन  काव्यसंग्रहातून त्यांनी शेतक-याचे जीवन, त्यांचे दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
           साहित्यलेखनातील या महत्वपुर्ण योगदानाबद्दल सचिन यांना आजपर्यंत विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांकडून तेरा  पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर साहित्य अकादमीकडून राष्ट्रीय सेमिनारसाठी गुजरातमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे कथासत्रामध्येही त्यांनी उपस्थिती लावली आहे. शिवांजली साहित्यपीठ जुन्नर येथे होणा-या शिवांजली बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. 
            सचिन यांच्या या कार्याची दखल घेत मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर यांचेकडून विशेष सन्मान करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून, साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।