मगनलाल बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान !


मगनलाल बागमार  'दृष्टिकोन' फुलोरा साहित्य रत्नाने
सन्मानित !

नाशिक(प्रतिनिधी)::- नाशिकचे जेष्ठ कवी, साहित्यिक, नाशिक मर्चंट बँकेचे माजी सरव्यवस्थापक मगनलाल बागमार यांच्या दृष्टिकोन या चारोळी काव्य संग्रहाला फुलोरा साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
         संगमनेर येथील फुलोरा कलेचे माहेरघर या संस्थेच्या वतीने, मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसूमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन सत्यशीव हॉल, संगमनेर येथे १२ वे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी नाशिकचे  साहित्यीक  मगनलाल बागमार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
           हास्य पंचमीकार  बंडा जोशी, साहित्यीक भगवान जोशी आणि प्राचार्य सौ. आशालता काळे यांच्या हस्ते 'दृष्टीकोन’ या चारोळी संग्रहासाठी बागमार यांना फुलोरा साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित काव्य संमेलनात त्यांनी त्यांची स्वरचित कविता ‘लेक’ सादर केली. रसीकांनी त्यांच्या कवितेला भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. रंजना बोरा आणि समूहाचे अध्यक्ष सचिन सातपुते यांनी केले. त्यांना मिळलेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

समग्र वारली चित्रसृष्टी प्रकल्पालासर्वतोपरी सहकार्य -ना. डॉ. गावित