"महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण ! खास. अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, पत्रकार अनिल थत्ते,चारूशिला देशमुख, कामगार नेते अभिजित राणे,या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला !!


न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१

"महाराष्ट्र स्वाभिमान गौरव" पुरस्कारांचं वितरण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ' आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. माजी केंद्रीय मंत्री खासदार कामगार नेते अरविंद सावंत, अभिनेत्री दिपाली सय्यद, गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते, राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका चारूशिला देशमुख, कामगार नेते संपादक अभिजित राणे, होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव तसेच मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून खास निमंत्रितांचं कवी संमेलन आयोजित करण्यात अाले होते. मकरंद वांगणेकर, श्रद्धा पौडवाल, रिया पवार,  विलास खानोलकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी सहज सुंदर कविता सादर करून मराठी भाषेप्रती आपली सेवा दिली आणि उपस्थितांची दाद मिळवली.
              कार्यक्रमाची सुरूवात सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. तेजस्विनी डोहाळे यांनी प्रस्तावना केली तर मैत्री संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरज भोईर यांनी जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाची भूमिका विषद केली. सत्काराला उत्तराला देताना खासदार अरविंद सावंत यांनी महासंघाचं कौतुक केलं. "संसदेत सात वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लाखो पत्र राष्ट्रपती आणि केंद्रीय भाषामंत्र्यांकडे पाठवून सुद्धा आजही अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसेल तर येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र करावा लागेल. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्र लेखक, कवी म्हणजे समाजभान बाळगणारी मंडळी. या सार्‍यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर दाद मागण्याची वेळ आली आहे."
            अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या, "करोनाचा प्रभाव आता बर्‍यापैकी कमी झाला आहे आणि डिबीएस ट्रस्टचं काम अगदी जोरात सुरू झालं आहे. महासंघाने यात आमची सोबत करावी आणि विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा."
                 गगनभेदी पत्रकार अनिल थत्ते यांनी कार्यक्रमाचं आयोजन संयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांचं कौतुक केलं. सर्व पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या. गगनभेदी आणि मराठी बिग बॉस बद्दल रंजक माहिती आणि किस्से सांगून सभागृहात जोष निर्माण केला.
             कामगार नेते संपादक अभिजित राणे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने उठवलेला आवाज सभागृहात मांडला. शेकडो आस्थापना आणि ६ लाखांहून अधिक कामगारांचं नेतृत्व करताना आलेल्या अनेक अडचणींची मिमांसा केली. सरतेशेवटी हा लढा अव्याहतपणे चालत राहणार असल्याचंही नमूद केलं.
           राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या संचालिका चारूशिला देशमुख ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होत्या. राष्ट्रसंत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या कामात आज देशमुखांची चौथी पिढी कार्यरत आहे. हे काम करताना साक्षात ईश्वर आपल्या आजूबाजूला असल्याचं जाणवतं. ह्या सार्‍याचं श्रेय त्या त्यांच्या सासूबाईंना तसेच घरातल्या सर्व ज्येष्ठांना देतात.
             याच कार्यक्रमात चारूशिला देशमुख यांची मैत्री संस्थेच्या राज्य संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. सदर नियुक्तिपत्र दिपाली सय्यद यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना प्रदान करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांतून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
          कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. शीतल पाटील यांनी सरनामा वाचन केले.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजेश जाधव, वनिता तोंडवलकर, तेजस्विनी डोहाळे, विनायक जावळेकर, विजय गोडबोले, संतोष भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !