प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री'  ४ मार्चपासून होतोय दाखल




प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री' 
४ मार्चपासून चित्रपटगृहात दाखल

 नाशिक (प्रतिनिधी )  नवोदित दिग्दर्शक योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांची लव्हेबल केमिस्ट्री 'वन फोर थ्री उद्या' ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित हा मराठी चित्रपट रोमँटिक चित्रपटांच्या गर्दीमध्ये पुढे सरसावत आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा हा प्रेममय चित्रपट व्यक्त करेल. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. पत्रकार परिषदेत अशी माहिती देण्यात आली यावेळी कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
             दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचे जबरदस्त खलनायकी असं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे यांची देखील भूमिका  आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिने 'भरली मना मध्ये ' हे चित्रपटातील गाणे सुमधूर आवाजात रेकॅार्ड केले आहे. तर चित्रपटातील  'वाचू दे इष्काचा प्राण' ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग 'पडला खटका' रेश्मा सोनावणे हिने शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात 'धिंगाणा' पार्टी सॉंग गायले आहे. 
        नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे.
          'वन फोर थ्री' चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टिझरने, गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)