११ मार्चला रेन्बो प्राईड ऑफ इंडिया सोहळ्याचे आयोजन !!
एलजीबीटींसाठी होणार "रेन्बो प्राईड ऑफ इंडिया फॅशन शो"
"हे फाऊंडेशनचा ११ मार्चला सोहळा"
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईसह देशभरातील एलजीबीटी समूहासाठी "हे फाऊंडेशनच्या वतीने डॉ. संगीता पाटील" यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे "रेन्बो प्राईड ऑफ इंडिया" ह्या भव्य फॅशन शोचे आयोजन ११ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. यात भारतभरातील स्पर्धक सहभागी होणार असून आपली कला सादर करतील.
यावेळी मिस्टर आणि मिसेस रेन्बो प्राईड यांची घोषणा होईल. सामाजिक एकता तसेच समाजात मुख्य प्रवाहात वावरताना कुठल्याही प्रकारे भेदभाव होऊ नये, या सामाजिक हेतूने तसेच जनजागृतीच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क – ८१०४९८२६२६, www.rainbowpride.in, www.heyfoundation.org
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा