१९६७ मधील रंगमंचावर अवतरलेले वाजे पाऊल आपुले आणी तीन दशकापूर्वी टिळक आणी आगरकर ही एक विचारधारा रसिंकांसाठी येत आहे !!! मुंबई मराठी साहीत्य संघ नाट्यनिर्मितीत पुन्हा सक्रीय !!! सविस्तरतेसाठी खालील लिंक वर क्लिक करा, कमेंट बाँक्स मध्ये नांव व मोबा.नंबरसहीत कमेंट करा !!!

नाटककार विश्राम बेडेकर लिखित ‘वाजे पाऊल आपुले’आणि ‘टिळक आणि आगरकर’रसिकांसाठी पुन्हा नव्याने रंगमंचावर!
       जयंत सावरकर आणि कौस्तुभ सावरकर पितापुत्रांचे दिग्दर्शन!
       टिळक आणि आगरकर नाटकाचे अभिवाचनाचे प्रयोग रंगणार!
        मुंबई मराठी साहित्य संघाची नाट्यशाखा पुन्हा निर्मितीत सक्रीय!
        संघाच्या गाजलेल्या कलाकृती होणार पुन:रुज्जीवीत!
        साहित्य संघ मंदिर डॉ. भालेराव नाट्यगृहात सर्वात कमी दरात त्यांची नाटके पहायला मिळणार!
      १९६७ मध्ये रंगमंचावर सादर झालेले प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित, दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी यांच्या अभिनयाने पावन झालेल्या ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकांच्या  पुनरुज्जीवन होत असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार, व उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी जाहीर केले. या संस्थेच्या इतर दर्जेदार –लोकप्रिय नाटकांची लवकरच पुनर्निर्मिती होणार असल्याचे संकेत प्रमोद पवारांनी दिले.
          अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी ‘वाजे पाऊल आपुले’ या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या २४ नोव्हेंबर पासून सर्वत्र सुरु होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे. जुन्या संचात काम केलेले आणि सध्या हयात असलेले एकमेव जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यात त्यांनी तेव्हा केलेलीच भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करीत असून त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशिलाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोबत अंशुमन म्हसकर,अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे गुणी कलावंत आहेत.
         विश्राम बेडेकरलिखित ‘टिळक आणि आगरकर’ हे सुमारे तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने रंगभूमीवर आणलेलं नाटक आज २०१८ मध्ये पुनश्च रंगभूमीवर येत आहे मात्र थोडं वेगळ्या स्वरुपात. त्याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत,त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केले जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं हे नाटक दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य पेललं आहे‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटाचे संवादकार कौस्तुभ सावरकर यांनी. अभिनेता अक्षय पेंडसे यांच्या निधनानंतर त्यांनी या अभिवाचनाच्या प्रयोगांना पूर्णविराम दिला होता. संघाने वाचिक अभिनयाद्वारे पुन्हा रसिकांना हा अलौकिक आनंद देण्याचे ठरवले असून हे प्रयोग विशेष ठरणार आहेत. ‘टिळक आणि आगरकर’नाटकाच्या अभिवाचनात सहभाग घेणाऱ्या कलावंतामध्ये गोपाळराव जोशी(उन्मन बाणकर), गोपाळराव आगरकर(अंगद म्हसकर),  यशोदा आगरकर(मिथिला मुरकुटे), बळवंतराव टिळक(कौस्तुभ सावरकर) तसेच ‘श्री. नाट्यरंग कर्जत’च्या नवोदित गुणी कलावंतांचाही सहभाग आहे.  हे प्रयोग ‘श्री. नाट्यरंग कर्जत’ या संस्थेच्या सहकार्याने सादर होतील.
       १९६७ साली ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाचे शेवटचे प्रयोग झाले, त्यानंतर पन्नास वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचे धाडस आम्ही करीत आहोत. हे नाटक खुसखुशीत संवादाने नटलेले आहे. संशय कल्लोळ या एकमेव नाटकाव्यतिरिक्त संशय या विषयावर दुसरे गोड कौटुंबिक नाटक आलेले नसावे. नटांच्या एरवींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा हे नाटक खूप वेगळं आहे. विश्राम बेडेकरांच्या हाताखाली सुमारे अडीच वर्षे त्यांचा सहाय्यक म्हणून काम केल्यामुळे आज हे नाटक बसवताना त्या अनुभवाची खूप मदत झाली असे जयंत सावरकर म्हणाले.
        या दर्जेदार नाटकांच्या पुनश्च आगमनामुळे प्रेक्षकांना एक अलौकिक अनुभूती मिळणार असून ज्यांनी हे नाटक पन्नास वर्षांपूर्वी पाहिले आहे, त्यांनाही ते नक्कीच आवडेल.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!