नामांकित हॉस्पिटल चे डाॅक्टर, कॅशियर, व उपस्थित एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नामांकित हॉस्पिटल चे डाॅक्टर, कॅशियर, व उपस्थित एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

 नासिक::- येथील नामको कॅन्सर हाॅस्पिटल च्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जहागिरदार,  कॅशियर महिला कर्मचारी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व डॉ . विशाखा यांच्या दालनात लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान उपस्थित महिला कर्मचारी गायत्री सोमवंशी या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

            तक्रारदार हे पिवळे रेशन कार्ड धारक असून त्यांची पत्नी यांचे नामको कॅन्सर हॉस्पिटल पेठ रोड नाशिक येथे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झालेली असून शस्त्रक्रिया व पेशंट यांना डिस्चार्ज देण्यासाठी तक्रार दाखल होण्यापूर्वी ३ एप्रिल  २०२५ रोजी ३००००/- हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी ९०००/- हजार रुपये स्वीकारले आहे, त्यानंतर दिनांक ७ एप्रिल रोजी पडताळणी मागणी कारवाई दरम्यान २१०००/- हजार रुपयाची मागणी करून त्यापैकी ११०००/- हजार रुपये स्वीकारले म्हणून इलोसे यांचे विरुध्द पंचवटी पोलीस स्टेशनं, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ , १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!