घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !
ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

          नासिक (जळगाव)::- तक्रारदाराकडून २३/०६/२०२५ रोजी आलेल्या तक्रारीची पंचांसमक्ष  पडताळणी केली असता मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसऱ्या हप्ता  मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा  हजाराची मागणी केली आहे.
     रोजी तक्रारदार यांच्याकडून मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील लोकसेवक ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ  व मांडकी ता. भडगाव जि. जळगाव येथील रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. 
६०००/- रुपयांची मागणी करून तडजोड अंती ५०००/- रुपये पंचा समक्ष ५०००/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.
        यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती व आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत आलेल्या तक्रारीप्रमाणे आज रोजी पडताळणी केली असता आरोपीने ६००० ची मागणी करुन तडजोड अंती पंचासमक्ष ५००० रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज रोजी सापळा कारवाई आयोजित केली असता आलोसे याने पंचसमक्ष ५०००रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले असून पाचोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
     
 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोबाईल जप्त करण्यात आला असून तपासणी करण्यात येत आहे. पाचोरा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि. १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. घरझडती पथक तात्काळ रवाना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !