विश्वनाथ मोरे यांचेकडून एक्केचाळीस लाखाची देणगी ! महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद- नाम.सौ.शितल सांगळे !! संस्थेच्या विभाग नामकरण सोहळ्याच्या कौतुकास्पद सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद -सौ. शीतल सांगळे     
******************************
         महात्मा फुले समाज शिक्षण संस्था संचलित, सौ.विमलताई विश्वनाथ मोरे शैक्षणिक संकुल आणि गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज नामकरण सोहळा नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शितलताई उदय सांगळे, अध्यक्षा जिल्हा परिषद, नाशिक तसेच नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार  पंकज भुजबळ यांचे शुभहस्ते व महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष   अँड. सुभाष सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  याप्रसंगी संस्थेस भरीव देनगी देणारे  विश्वनाथ सोनाजी मोरे यांनी त्यांच्या धर्मपत्नी स्व. विमलताई  विश्वनाथ मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या आवारास पत्नीचे नांव देण्यासाठी रुपये एक्केचाळीस लक्ष देणगी संस्थेस देण्यामागची भुमिका विषद केली. विश्वनाथ मोरे म्हणाले की, मुले आणि मुली सुस्थापित असल्यामुळे  स्वतःची पेंशन बँक खाती जमा होती. धर्मपत्नी स्व. विमलताई यांचे सौभाग्याचे लेने तथा सर्व दागिने कुटुंबाने संस्थेस दान करण्याची मुभा दिली. स्व. विमलताई यांचे सर्व दागिने विकुन व स्वतःची बँक खात्यावरिल पेंशन रक्कम असे एक्केचाळीस लक्ष रुपये संस्थेस देणगी स्वरुपात दिले, हे नमुद करतांना अभिमान वाटत असल्याचे नमुद केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. निंबा मुका जाधव यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या मुली, जावई  यांनी संस्थेस रुपये पंधरा लक्ष देणगी दिली. या योगदानाबद्दल संस्थेच्या सायन्स विभागाला गुरुवर्य निंबा मुका जाधव सायन्स ज्युनियर कॉलेज ऐसे नामकरण करण्यात आले. या देणगीबाबत स्व.निंबा मुका जाधव यांचे जावई तथा संस्थेचे संचालक माधव भिकाजी मोरे म्हणाले की, स्व. निंबा मुका जाधव हे पहिले गुरु नंतर सासरे होते, परंतु सासरे या नात्या पेक्षाही ते गुरु म्हणुन त्यांचा अभिमान होता. अशा या महान व्यक्तिचे नाव सायन्स कॉलेजला देत असल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करुन महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या एका निस्पृह व पारदर्शक आर्थिक शिस्त असणाऱ्या संस्थेस देणगी दिली जात असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले. पंकज भुजबळ यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन संस्थेच्या चांगल्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा प्रमुख अतिथि म्हणुन बोलताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शितल सांगळे यांनी नमुद केले की, समाजात आर्थिक संपन्न समाज खुप आहे, परंतु दानशुर लोक आढळत नाहीत. संस्थेस पैसा दान करण्यासाठी मन मोठे असावे लागते. महात्मा फुले संस्थेस विश्वनाथ मोरे यांनी रुपये एक्केचाळीस लक्ष व स्व.निंबा मुका जाधव यांचे परिवाराने रुपये पंधरा लक्ष देणगी दिल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेने असेच सामाजिक व शैक्षणिक कार्य पुढे चालु ठेवावे असे आवाहन केले. संस्थेस योगदान देणाऱ्या सर्व कार्यकारी मंडळासह सर्व संचालक, सर्व निमंत्रित संचालक, सर्व सभासद, संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन सांगळे यांनी केले. महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेने, संस्थेस महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन शिक्षणाचा वारसा चांगला चालवत असल्याबद्दल संस्थेचे विशेष अभिनंदन केले. संस्थेस योगदान देणाऱ्या महनीय व्यक्ती यांचा सन्मान उपस्थित मान्यवर यांचे शुभहस्ते करण्यात आला. या सोहळयास संस्थेचे, कार्याध्यक्ष श्री. भाऊराव बच्छाव , सरचिटणीस श्री. पुरुषोत्तम फलसुंदर, चिटनीस श्री. बाळासाहेब पुंड, खजिनदार श्री. दिनेश बच्छाव, संचालक सर्वश्री जगन्नाथ शिंदे, दादाजी खैरनार, शशिकांत जाधव,राजाराम वाघ, वसंत अहिरे, राजेंद्र माळी, मकरंद सोनवणे, सुधाकर जाधव, माधव मोरे, प्रमोद आहेर,संजय अहिरे, श्रीमती जयाताई बच्छाव, सुनीता खैरनार, विजया पगार, प्राचार्य मधुकर बच्छाव, मुख्याध्यापक सुनील शेवाळे, मुख्याध्यापक माधुरी फडके, प्राचार्य अमोल कदम, व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास साहेबराव आहेर, कमल शेवाळे, डॉ. आशिष जाधव, पुंजाजी पाटील, सचिन जाधव, जी.पी. खैरनार, प्रमोद वाघचौरे, रमेश खैरनार, निवृत्ती खैरनार, मधुकर राऊत, प्रा. मधुकर शिंदे, व सभासद मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर यांनी केले तर सूत्रसंचालन निवृत्ती कमोदकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !