कपिल पाटील हे विधानपरिषदेतील अभ्यासू व झुंजारशिक्षक व्यक्तीमत्वाचे आमदार-छगन भुजबळ ! शिक्षकभारती , लोकतांत्रिक दल व एसकेडी ग्रुप यांच्यावतीने आमदार कपिल पाटील यांच्या भव्य सत्काराच्या बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व शेअर करा !!!

    नाशिक,दि.९ डिसेंबर :- बी.टी.देशमुखांनंतर विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न तळमळीने  मांडणारेकपिल पाटील हे अभ्यासू शिक्षक आमदार असल्याचे गौरोदगार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काढले.मुंबई शिक्षक मतदारसंघातुन तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल नाशिक जिल्हा शिक्षक भारती संघटना आणि लोक तांत्रिक दल यांच्यावतीने आ.कपिल पाटील यांचा सत्कार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तेस्वामी नारायण हॉल येथेपार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
             यावेळी आ.दिपीका चव्हाण, आ. जे.पी. गावित, शिक्षक भारतीचे राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक विभागाचे अध्यक्ष नवनाथ केंड,मविप्रचे अध्यक्षडॉ.तुषार शेवाळे,व्हीएननाईक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,  डॉ.कैलास कमोद, प्रसाद हिरे, कविता कर्डक,शोभा मगर, राज्य महिला अध्यक्ष स्वाती बेलकर, राज्य उपाध्यक्ष किशोर कदम, सुभाष मोरे, भरत  शेलार,जालिंदर सरोदे,जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, प्रकल्प पाटील,के.के.अहिरे, अशोक मोरे, विनायक लाड,ज्योत्स्ना शिंदे, पुष्पा गांगुर्डे, अदिती शिंदे,प्रकाश शेळके, मनपा प्रशासकीय अधिकारी उदय देवरे, गणेश फुलसुंदर आदी उपस्थित होते.
            यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,महाराष्ट्रातील समाजवादी राजकीय परंपरा पूर्णपणे अस्तंगत झालेली असताना कपिल पाटील यांनी अत्यंत झुंझारपणे हा किल्ला लढवत ठेवला आहे. त्यांचा विचारधारेवरील अढळ विश्वास व अविरत परिश्रम ही त्यांच्या यशामागील प्रमुख कारणे आहेत. कपिल पाटील यांची लोकशाही समाजवादी मूल्ये व गांधीवाद यांवर श्रद्धा असली, तरी विरोधी विचारसरणीच्या माणसाचे मन जिंकण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मुळचे हाडाचे पत्रकार असलेले राष्ट्र सेवा दल व पुढे छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतून समाजकारणाचे धडे गिरवलेल्या पाटील यांनी विधिमंडळात शिक्षणाच्या प्रश्नावर कायम समाजातील नाही रे वर्गाची बाजू घेऊन सरकारला धारेवर धरण्याचे काम केले.
            शिक्षकांचे वेतन युनियन बँकेतून मुंबई बँकेत जमा करण्याच्या सध्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निर्णयाला पाटील यांनी जोरदार विरोध केला. ज्या बँकेवर विविध आरोपांची राळ उडत आहे, त्या बँकेत शिक्षकांचे पगार जमा करणे धोक्याचे होते. पाटील यांनी विधिमंडळात या विरोधात आवाज उठवलाच पण न्यायालयातही दाद मागितली. न्यायालयानेही शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. पाटील यांच्या या प्रामाणिक विरोधामुळे सरकार नमले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली व हे पगार वेळेवर होण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिले. आपल्याच सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात मुख्यमंत्र्याला निर्णय घ्यायला लावणे सोपे नसते. पाटील यांच्या लढाऊ बाण्याबरोबरच मुत्सद्दीपणाचा तो विजयअसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            जनगणना,निवडणुकांमधील कामे,आरोग्य विभाग वा सरकारच्या विविध विभागांना आवश्यकता भासेल तेव्हा सर्वेक्षण करणे, यात शिक्षक पिचून जातात. कपिल पाटील यांनी याच्या विरोधात विधिमंडळातील आपल्या सदस्यत्वाचा वापर करून सरकारला अनेकदा धारेवर धरले आहे. मुंबईतील रात्र शाळांचा प्रश्नही पाटील यांनी अत्यंत हिरीरीने विधिमंडळात मांडला. रात्र शाळा हे मुंबईतील श्रमिकांचे ज्ञानमंदिर आहे. शिक्षणाचे महत्त्व समजल्याने अनेक गरीब मुले दिवसा काम करून या शाळांमधून शिक्षण घेत असतात, त्यामुळे या शाळा बंद होता कामा नये, त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे,यासाठी पाटील विधिमंडळात कायम आक्रमकपणे भूमिका घेतली. शिक्षणाचे कंत्राटीकरण व खासगीकरण याच्या विरोधातही ते कायम जोरदार आवाज उठवतात. हे सगळे करत असताना देशातील वाढत्या धर्मांधतेच्या विरोधात ते विधिमंडळापासून रस्त्यावरील लढाईपर्यंत सर्वत्र सारख्याच ताकदीने उतरतात. समाजवादी, गांधीवादी विचारांच्या लढवय्या कार्यकर्त्याला मुंबईतील शिक्षकांनी सलग तिसऱ्यांदा विधिमंडळावर निवडून दिले आहे.
           ते म्हणाले की, कुणालाही साडी, चोळी,पैठणी न देता कपिल पाटील हे तिसऱ्यांदा मुंबई मतदार संघातून निवडून आले. ते एक हाडाचे पत्रकार आहे.त्यांनी स्थापन केलेल्याशिक्षक भारतीच्या लोगो मध्ये सावित्रीबाई फुलेआणि फातिमा यांचा फोटो आहे. यातच सर्वकाही असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.खऱ्या अर्थाने शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले,फातिमा शेख असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणांची कवाडे खुली करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे यांचे पूजनकरण्यात यावे. शिक्षणात इतर देश पुढे असल्याने विकासात पुढे आहे.आपल्याकडे मात्र शिक्षणावर अधिकचा खर्च होऊन देखील आजही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. आपल्याकडेशिक्षण मंत्री बदलला की धोरणे देखील बदलतातअशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
            ते म्हणाले की, नाही नाही त्या गोष्टी शिक्षणात घुसवल्या जात असल्याने खरा इतिहास हळू हळू नाहीसा होईल याची भीती त्यांनी व्यक्त केली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही.राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे.सहकार आणि शिक्षण संस्था संपविण्याचा सरकारचा डाव असून सूतगिरण्या,साखर कारखाने बंद पडल्या जात आहे.त्यामुळे इतिहास बदलायचा नसेल तरसरकार बदलण्याची ताकद तुमच्यात आहेत्यामुळे  आपले प्रश्न सोडविणारे शासन बसविण्याची जबाबदारी तुमची आहे असे आवाहन त्यांनी केले.शासनाच्या विरुद्ध बोलल्यामुळे पत्रकारांना देखील आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. लिहिण्याच्या बोलण्याच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरूअसल्याचे सांगून  मला तुरुंगात अडकविण्यात आले होते. त्यावेळी प्रचंड आजारी पडलो असतांना सभागृहात छगन भुजबळ यांना संपविण्याचा डाव आहे का असा सवाल  कपिल पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारचे लक्ष वेधले असे सांगून त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
           यावेळी आ.कपिल पाटील म्हणाले की,मंत्रालयातील पत्रकार म्हणून काम करत असतांना चळवळीतून पुढे येत आमदार झालो. त्यावेळी पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी माझा पहिला सत्कार केला. आणि आज पुन्हा त्यांच्या हस्ते सत्कार होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी मला राजकारणात ताकद देण्याचे काम केले असे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर छगन भुजबळ काम करत असून देशभर समतेच्या विचारांसाठी ते काम करत आहे. हे ज्यांना खुपले त्यांच्यामुळे छगन भुजबळ यांना त्रास सहन करावा लागला. सद्याच्या सरकारकडून शिक्षण क्षेत्रातील ज्या थोर लोकांनी चळवळ उभीकेली ती चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा  डाव असून तो यशस्वी होत असून राज्यातील शाळा बंद पडत आहे. राज्यातील ३ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित आहे. शिक्षणात खाजगीकरण व्यापारी करण हे शिक्षण व्यवस्थेसाठी धोका  असल्याचे ते म्हणाले.
              १५ ते वीस वर्षा पासून शिक्षक पगारापासून वंचित आहे. शाळांना अनुदान नाही. राज्यातील बहुजन वर्गाच्या शिक्षण संस्था मोडीत काढण्याचा सरकार कडून प्रयत्न केला जात आहे. आपल्या संस्काराची होळी होत असल्याने शिक्षक क्षेत्रात करियर करण्यासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. सद्याच्या सरकारकडून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचे काम करत आहे. बालभारतीच्या अभ्यास मंडळा वरून जयंत नारळीकर तसेच अनेक नामवंत अभ्यासू व्यक्तींना समिती वरून काढण्यात आले ही दुर्दैवाची बाब आहे. शिक्षणक्षेत्र जर वाचले नाही तर महाराष्ट्र बुडून जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. बहुजन समाज टाकायचा असेल तर छगन भुजबळ यांना पाठींबा देऊन पाठबळ उभी करूया असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना आवाहनकेले.
           यावेळी राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे म्हणाले की, शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचली आहे. त्याचे नेतृत्व महाराष्ट्रातील एकमेव आ.कपिल पाटील करत असून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करू द्या शिक्षक समाधानी असेल तरच ते आपले काम करू शकतात असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.दिपीका चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, शिक्षक भारतीचे पदाधिकारी नवनाथ केंड, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ऍड. शरद कोकाटे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !