७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

         नाशिक - जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचार्यांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.
          जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचा-यांना परिचर (गट -ड) संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक लिपिक (गट क) सर्वगात पदोन्नती देण्यात येते. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील पत्रानुसार सदरची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासन विभागाने १६२ पात्र कर्मचा-यांचा यादी तयार केली होती. आज या कर्मचार्यांना समुपदेशानासाठी कर्मचा-यांना बोलावण्यात आले होते. यातील ११ कर्मचारी अपात्र तर ७२ कमर्चार्यांनी पदोन्नतीस नकार दिल्याने उर्वरित ७९ जणांना आज पदोन्नती देण्यात आली. यावेळी उमेदवारांना उपलब्ध जागांची माहिती देण्यात येवून त्यातील तीन जागांचा प्राधान्यक्रम देण्यात आला. कर्मचार्यांनी दिलेल्या तीन पर्यायाप्रमाणे त्यांना उपलब्ध पर्यायातून पदोन्नती देण्यात आली. त्याचप्रमाणे समुपदेशन झाल्यावर तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकीरण सोनकांबळे तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

प्रशासन की ताकद !! बिगर मंत्री मंडल की सहायता के भी प्रदेश का शासन सफलतापूर्वक चलाया जा सकता है । प्रशासन को भी उन्होंने यह स्पष्ट संदेश दिया है कि मंत्रियों के बीच विभागों के बंटवारे के न हो पाने के बावजूद मुख्यमंत्री पूरे प्रदेश को ‘‘नौकरशाही‘‘ के माध्यम से आवश्यक कार्य निष्पादित (एग्जीक्यूट) कर संदेश देने में सक्षम हैं।