ग्रामसेविका लाचलुचपतच्या जाळ्यात ! १४ व्या वित्त आयोगांतर्गत अंगणवाडीच्या कामाचे बीलाचा धनादेश काढण्यासाठी १५०००/- रूपयांचा लाचेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
मंगळवेढा जि. सोलापूर ::- १४ व्या वित्त आयोगांतर्गत अंगणवाडीचे वाँल कंपाऊंड चे कामाचे ३२ वर्षीय ठेकेदार यांच्याकडून १५०००/- रूपये रकमेची लाच स्वीकारतांना ग्रामसेविका व एक खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात !
१) श्रीमती अर्चणा लक्ष्मण केंदुळे, वय ३६ वर्षे, ग्रामसेवीका मौजे लमाण तांडा ( बालाजीनगर) रा. गुंगे गल्ली, मंगळवेढा जि. सोलापूर
२) तानाजी मनोहर रोकडे, वय ४२ वर्षे(खाजगी इसम) रा. मुडवी ता. मंगळवेढा जि सोलापूर.
यातील तक्रारदार यांनी १४ व्या वित्त आयोग अंतर्गत गावातील अंगणवाडीचे वाॅल कंपाऊंड चे काम केले आहे. सदर कामाचे बिलाची रक्कम ९७,०००/- रूपयेचे चेक देण्यासाठी
आलोसे नं १ यांनी तक्रारदाराकडे १५,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम १५,०००/- रूपये पंचायत समिती कार्यालय मंगळवेढा येथे आरोपी नं २ यांचे मार्फत स्विकारली असता रंगेहात पकण्यात आले आहे.
सक्षम अधिकारी मा.श्री डॅा राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधीकारी, जिल्हा परिषद, सोलापूर व सापळा पथकात अरूण देवकर, पो.उप अधीक्षक, सफौ.जाधवर,पोह,पवार पोशि. स्वामी, जानराव होते.
पुढील तपास पोलीस निरिक्षक कविता मुसळे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा