नासिक जिल्हा राज्यात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर-डाँ.नरेश गिते, ! जिओ फेन्सिंगद्वारे १००% पाण्याच्या स्रोतांचे नमुने गोळा-इशादीन शेळकंदे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


जिओ फेन्सिंग करून पाणी नमुने गोळा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल

        नाशिक जिल्ह्यातून सार्वजनिक स्त्रोतांचे रासायनिक तपासणी अभियान राबवून सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे पाणी नमुने MRSAC नागपूर यांनी तयार केलेल्या जिओ फेन्सिंग मोबाईल अँपचा वापर करून गोळा करण्यात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे डॉ. नरेश गिते यांनी पाणी गुणवत्ता आढावा बैठकीत सांगितले.

         पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समिती अंतर्गत जिओ फेन्सिंगद्वारे पाणी नमुने गोळा करण्याचे काम दि. १ आक्टोंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत करावयाचे होते, या अनुशंगाने नाशिक जिल्ह्यात जिओ फेन्सिंग मोबाईल अँपचा वापर करून एकूण ७३९२ स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात प्रथमच स्त्रोतांचे १००% टॅगिंग करण्यात आले असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. या कामात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकास्तर ते ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करून आरोग्य, ग्रामपंचायत व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी अत्यंत चागल्या प्रकारे समन्वय साधून विहित वेळेत काम पूर्ण केले असल्याचे डॉ. गिते यांनी नमूद केले. सदर सर्व स्रोतांच्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असणाऱ्या प्रयोगशाळेत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       दूषित पाणी नमुने, टीसीएल नमुने, तालुकास्तरा वरील पाणी गुणवत्ता बैठक या विषयांवर डॉ. गिते यांनी यावेळी आढावा घेतला यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, ग्रामपंचायत विभागाचे राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, कार्यकारी अभियंता पी.ठाकूर, पाणी गुणवत्ता निरीक्षक, सल्लागार, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक इ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।